
प्रसाद ताम्हणकर << [email protected] >>
गेले काही दिवस सातत्याने चर्चा सुरू होती, ती AI अर्थात आर्टिफिशियल डायमंडची. कृत्रिम हिऱ्यांबद्दल आपल्याला माहिती आहे, काही जणांनी त्याचा वापर केलादेखील असेल. मात्र आता हिरे चक्क प्रयोगशाळेत बनू लागले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनलेले हे हिरे इतके हुबेहूब नैसर्गिक हिऱ्यांसारखे दिसतात की, अनेकदा दोघांमधला फरक समजण्यासाठी पारखी लोकांनादेखील संभ्रमात टाकायला सुरुवात केली आहे. खरा हिरा कोणता याची पारख करण्यासाठी त्यांची दोन-दोनवेळा प्रयोगशाळेत चाचणी करावी लागत आहे. उघडय़ा डोळ्यांनी दोन्हीमधला फरक ओळखणे अशक्य असल्याचे अनेक पारखी लोक कबूल करत आहेत.
नैसर्गिक हिरे पृथ्वीच्या आत खोलवर उष्णतेने आणि दबावाखाली तयार होतात. नैसर्गिक हिरा हा कार्बनचा एक प्रकार आहे. पृथ्वीच्या आत सुमारे चार किलोमीटर खोलीत जास्त तापमान असल्यामुळे कार्बन गरम, लालबुंद होतो. पृथ्वीच्या आत अचानक झालेल्या हालचालीमुळे हा लाल, गरम कार्बन बंदुकीच्या गोळीच्या वेगाने म्हणजेच 200 मीटर प्रति सेकंद किंवा त्याहून अधिक वेगाने पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येतो आणि पूर्णपणे थंड होतो, नंतर त्याचे हिऱ्यात रूपांतर होते. साधारण 1950 सालापासून शास्त्रज्ञ पृथ्वीच्या पोटात घडणारी ही प्रािढया पृथ्वीच्या पृष्ठभागावर अर्थात प्रयोगशाळेत घडवून आणण्यासाठी प्रयत्न करीत होते.
कृत्रिम हिरा तयार करण्यासाठी शास्त्रज्ञ दोन प्रकारचे तंत्र वापरतात. उच्च दाब आणि उच्च तापमान प्रणालीमध्ये शुद्ध
ग्रॅफाईट हिऱ्याच्या बीजा भोवती (डायमंड कोर) ठेवला जातो आणि सुमारे 1500 सेल्सियस तापमानाच्या संपर्कात आणला जातो. चेंबरवर सुमारे 1.5 दशलक्ष पौंड प्रति चौरस इंच दाब दिला जातो. दुसऱ्या प्रािढयेला रासायनिक बाष्प जमा करणे म्हणतात. या प्रािढयेत डायमंड कोर कार्बनयुक्त वायूने भरलेल्या सीलबंद चेंबरमध्ये ठेवला जातो आणि सुमारे 800 डिग्री सेल्सियसपर्यंत गरम केला जातो. या प्रािढयेत वायू हिऱ्याच्या मध्यभागी चिकटतो आणि अणूंच्या मदतीने हिरा तयार होतो.
ही दोन्ही तंत्रे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात समोर आली. मात्र असे असूनही गेल्या काही वर्षांत झालेल्या तंत्रज्ञान ाढांतीने या प्रयोगांना पूर्ण चालना मिळाली आहे. पूर्वीच्या काळी या तंत्रज्ञानाची माहिती असणारे लोक अत्यंत कमी होते आणि मशिनरीदेखील प्रगत नव्हती. मात्र आता अत्याधुनिक मशिनरीच्या मदतीने अनेक लोक जगभरात या व्यवसायात उतरले आहेत. आता या हिऱ्यांच्या किमतीदेखील पूर्वीपेक्षा प्रचंड कमी झालेल्या आहेत आणि कामातदेखील खूप अचूकता आलेली आहे.
हे कृत्रिम हिरे आता अनेक ग्राहक सर्रासपणे आपल्या दागिन्यांसाठी निवडत आहेत. आपण लग्नात अथवा साखरपुडय़ात ज्या आकाराची अंगठी वापरतो, तिच्यातला नैसर्गिक हिरा ज्या आकाराचा असतो, अगदी त्याच आकाराचा हिरा कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेत बनवल्यास तो नैसर्गिक हिऱ्याच्या मूळ किमतीच्या अवघ्या 20 टक्क्यांत तयार होतो. येणाऱ्या काळात कृत्रिम हिऱ्यांची मागणी प्रचंड वाढणार असून त्याची बाजारपेठ कित्येक टक्क्यांनी वाढण्याची शक्यता हिरे व्यवसायातील तज्ञ मंडळी व्यक्त करत आहेत.
हिंदुस्थान हिरे व्यवसायात पुरातन काळापासून स्वत:चा दबदबा राखून आहे. असे मानले जाते की, जगातील 10 पैकी 9 हिरे एकटय़ा सुरत शहरात पॉलिश केले जातात. कृत्रिम हिऱ्यांची बाजारपेठ आपल्या देशातदेखील प्रचंड वेगाने वाढत असून अनेक स्वदेशी प्रयोगशाळा जोडीने उभ्या राहत आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या मते, हिंदुस्थान दरवर्षी सुमारे 30 लाख प्रयोगशाळेत बनवलेल्या हिऱ्यांचे उत्पादन करतो, जे जागतिक उत्पादनाच्या 15 टक्के आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी सरकार विविध योजना आखत असल्याचेदेखील सांगितले जात आहे.
हिऱ्यांची आवड असलेल्या, मात्र त्यांच्या प्रचंड किमतीमुळे त्यांची सहज खरेदी न करू शकणाऱ्या मध्यमवर्गासाठी कृत्रिम हिऱ्यांचा एक जबरदस्त पर्याय उपलब्ध झाला असून पुढील तीन ते चार वर्षांत हा व्यवसाय या ग्राहकांना पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतो की काय, अशी शंकादेखील व्यक्त होऊ लागली आहे.





























































