
दहिसर बोरीवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटून पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रेल्वे अर्धा तास उशिराने धावत असून ऐन कामाच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
सकाळी 10च्या सुमारास दहिसर बोरीवली दरम्यान एसी लोकलची वायर तुटल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. सध्या वायर जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पण प्रवाशांनी रेल्वेतून खाली उतरून पुढचा प्रवास करत आहेत. हा मोठा बिघाड असल्याने संपूर्ण मार्गावर त्याचा फटका बसला आहे.


























































