
चंद्रपूर शहरात आज तापमानाने उच्चांक गाठला असून आज 42.2 अंश तापमनाची नोंद झाली आहे. राज्यातील हे सर्वाधिक तापमान ठरले आहे. तर देशात चंद्रपूरचं तापमान चौथ्या क्रमांकाचे ठरलं आहे. चंद्रपूर शहराची जगात सर्वाधिक उष्ण शहर म्हणून ओळख आहे. मागच्या काही काळात चंद्रपूरचं तापमान सतत वाढत आहे.
यंदा एप्रिल महिन्यातच तापमानाने 42.2 चा आकडा गाठला आहे. कालचे तापमान 41.8 होते, तीन दिवसात 4 अंशाने तापमानात वाढ झाली आहे. तापमानाचा हा वाढता पारा येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्येच हे हाल आहेत, तर पुढच्या महिन्यात पारा कितीवर जाईल, याचा विचारच घाम फोडणारा असल्याचे नागरिक म्हणत आहेत.





























































