ढगांची घुसळण, विजांचा कडकडाट 49 वर्षांचा विक्रम मोडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पश्चिम उपनगरात आज भल्या पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईकरांची साखरझोप मोडली. एका तासात तब्बल 14.8 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. गेल्या 49 वर्षांत एप्रिल महिन्यात झालेला हा सर्वाधिक पावसाचा विक्रम आहे, अशी माहिती कुलाबा वेधशाळेच्या संशोधक सुषमा नायर यांनी दिली.