उंची वाढविण्यासाठी तरूणाने खर्च केले कोट्यावधी रूपये, कारण ऐकून व्हाल अवाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेकांना ठेंगणे असल्यामुळे अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. अमेरीकेतील एका व्यक्तीने ठेंगणेपणाला कंटाळून उंची वाढविण्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च केले आहेत. त्याने असे का केले याचे कारण ऐकून अवाकच व्हाल.

ही घटना अमेरीकेची असून मोसेस गिब्सन असे त्या तरूणाचे नाव आहे. उंची वाढविण्यासाठी त्याने दोन वेदनादायी शस्त्रक्रिया केल्या, दि कॉस्मेटिक लेनने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो सांगत आहे की, त्याने कशापद्धतीने शस्त्रक्रिया करून उंची वाढवली. मोससे गिब्सन याची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी 5 फुट 3 इंच उंची होती. 2016 साली त्याने उंची वाढविण्यासाठी पहिल्यांदा शस्त्रक्रिया केली होती. याने त्याची उंची तीन इंच वाढून 5 फुट 5 इंच झाली. आता त्याने आणखी एक शस्त्रक्रिया केली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार त्याची हाइट 2 इंच आणखी वाढून 5 फुट 10 इंच झाली आहे.

या व्हिडीओमध्ये गिब्सन बोलत आहे की, उंची कमी असल्यामुळे त्याची डेटिंग लाईफ खराब होत होती. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याने उंची वाढविण्यासाठी अनेक औषधे घेतली होती. एवढेच नाही तर या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी त्याने आध्यात्मिक मार्गही अवलंबला मात्र काहीच उपयोग झाला नाही. अनेक प्रयत्न करूनही उंचीवर काहीच परिणाम होत नसल्याचे जाणवले त्यावेळी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र ही शस्त्रक्रिया फार महागडी होती. पैशांची व्यवस्था करण्यासाठी त्याने दिवसा सॉफ्टवेअर इंजिनीअरचे काम केले आणि रात्री उबेर गाडी चालवायचा. अशापद्धतीने तीन वर्ष त्याने 60 लाख 78 हजार 938 रूपयांची व्यवस्था केली. 2016 साली पहिली शस्त्रक्रिया केल्यानंतर दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी 80 लाख 20 हजार 859 रूपये खर्च केले. त्याला आशा आहे की, त्याची 2 इंच उंची आणखी वाढेल. त्याने सांगितले की पहिल्या शस्त्रक्रियेनंतर महिलांसोबत बोलण्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्याची एक प्रेयसीही आहे.

द कॉस्मेटिक लेननुसार, गिब्सनची उंची वाढविण्यासाठी त्याच्या तिबीया आणि फॅबुला नावाच्या हाडाला कापले जाते आणि त्यांना एका स्क्रूच्या माध्यमातून जोडले. शस्त्रक्रियनंतर मोसेस दिवसातून तीन वेळा उंची वाढवणाऱ्या उपकरणाचा वापर करतो. जे एका वेळी एक मिलिमीटर कापलेल्या हाडांना हळूहळू वेगळे करते. ही प्रक्रिया त्याच्या शरीराला नवीन हाडांच्या ऊती तयार करण्यास प्रोत्साहित करते, ज्यामुळे हाडांच्या फ्रॅक्चरमुळे निर्माण झालेली पोकळी भरून निघते. यानंतर मोसेस 5 फूट 10 इंच असेल.