कुपवाडमध्ये सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारधार शस्त्राने वार करून पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला आहे. कुपवाड शहरातील बामणोली कमानीजवळ रविवारी रात्री ही घटना घडली. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले आहेत.

अमर ऊर्फ गुट्टय़ा राजेंद्र जाधव (वय 27, रा, सुवार्ता टॉकीजसमोर, कुपवाड) असे मृताचे नाव आहे.  अमरचा चायनीज व्यवसाय होता. तो आपल्या दुचाकीवरून बामणोली रस्त्यावरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी रस्त्यावर अंधाराच्या ठिकाणी अमरला अडवून धारधार शस्त्र्ाांनी त्याच्यावर वार केले. वर्मी घाव बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेची महिती मिळताच, कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अमरला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, घटनास्थळावरून पोलिसांनी शस्त्र जप्त केले आहे.

अमर जाधव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्या खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आरोपींच्या शोधासाठी कुपवाड पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.