‘फिल्मफेअर’मध्ये ‘गंगूबाई’ने मारली बाजी, आलिया भट, राजकुमार राव सर्वोत्कृष्ट कलाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदी सिनेसृष्टीतील मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुरुवारी मुंबईत पार पडला. यामध्ये ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. अभिनेत्री आलिया भट, अभिनेता राजकुमार राव सर्वोत्कृष्ट कलाकार ठरले. ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांना ‘जीवन गौरव’ने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे यंदाचे 68 वे वर्ष आहे.

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडलेल्या या सोहळय़ाला बॉलीवूड सेलिब्रिटींची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती. अभिनेता सलमान खानने या सोहळय़ात सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडली. ‘गंगूबाई काठियावाडी’ने तब्बल दहा श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले, तर ‘बधाई दो’ने क्रिटिक्स अवॉर्ड श्रेणीत सर्वाधिक सहा पुरस्कार जिंकले. ‘ब्रह्मास्त्रः भाग-1 शिवा’ लाही चार श्रेणीत पुरस्कार मिळाले आहेत.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – संजय लीला भन्साळी (‘गंगूबाई काठियावाडी’)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – अनिल कपूर (‘जुग जुग जियो’)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – शीबा चड्ढा (‘बधाई दो’)
सर्वोत्कृष्ट पटकथा – अक्षय घिल्डियाल, सुमन अधिकारी आणि हर्षवर्धन कुलकर्णी (‘बधाई दो’)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – अरिजित सिंह (‘ब्रह्मास्त्र’मधील ‘केसरिया’ गाणे)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) – भूमी पेडणेकर (‘बधाई दो’)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) – तब्बू (‘भूलभुलैया 2’)
सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स) – हर्षवर्धन कुलकर्णी (‘बधाई दो’)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) – संजय मिश्रा (‘वध’)
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक – जसपालसिंह संधू आणि राजीव बरनवाल (‘वध’)
सर्वोत्कृष्ट गीतकार – अमिताभ भट्टाचार्य (‘ब्रह्मास्त्र’ – ‘केसरिया’ गाणे)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – कविता सेठ (‘जुग जुग जियो’ – ‘रंगीसारी’ गाणे)