ट्विटरवरील लेख वाचण्यासाठी युजर्सना पैसे मोजावे लागणार 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माइक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर मीडिया पब्लिशर्स आणि पंटेंट क्रिएटर्सचे लेख वाचण्यासाठी युजर्सला आता लवकरच पैसे मोजावे लागणार आहेत. ट्विटरची शब्दमर्यादा वाढवल्यामुळे आता लेखही ट्विटरवर पाठवणे शक्य होणार आहे. या माध्यमातून मीडिया पब्लिशर्स आणि पंटेंट क्रिएटर्सला कमाई करता येणार आहे. मात्र ही कमाई करताना ट्विटर युजर्सला महिन्याचे सबस्क्रिबशन घ्यावे लागणार आहे. महिन्याचे सबस्क्रिबशन न घेता केवळ एखादा लेख वाचायचा असेल तर त्या एका लेखाचे पैसे भरून तो लेख वाचता येणार आहे. ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी या बदलांची घोषणा केली होती. त्यानंतर आता मे महिन्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.