देवळाली प्रवरामध्ये भंगार दुकानाजवळ आग; 50 हजाराचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवळाली प्रवरा येथील भंगार दुकानाजवळील वेड्या बाभळीच्या काट्यांनी पेट घेतल्याने आग लागली. त्यात दुकानाजवळ ठेवलेल्या भंगार मालातील टायर व इतर साहित्य पेटल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीत भंगार दुकानाच 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. भर दुपारी आग लागल्याने आग विझविण्यास अडचणीचा सामना अग्निशमन कर्मचाऱ्यांना करावा लागला.

भंगार दुकानाशेजारील काटवानात अज्ञात व्यक्तीने काट्या पेटवुन दिल्याने भंगार दुकानाशेजारील टायर, ठिबक सिंचन पाईप व इतर फायबर वस्तू जळून खाक झाल्या. देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाने तीन बंबाचा वापर करुन आग आटोक्यात आणली.