
तुळशीमध्ये विषाणुंना नष्ट करण्याचे गुणधर्म आहेत. जे त्वचेच्या समस्या जसे मुरूम, स्किन टॅनिंग, रेड रॅशेस अशा अनेक समस्यांपासून आराम देते. तुळशीचा वापर फेस पॅक, फेस स्टीम, क्लिन्जर, इत्यादी स्वरूपातही करू शकता.या टोनरमुळे पुरळ, स्किन एजिंग, पिग्मेंटेशन, स्किन कंडीशनिंग या समस्येपासून सुटका मिळेल.
तुळशीचे पानं, गुलाब जल आणि ग्लिसरीन या पदार्थांपासून तुळशीचे टोनर घरच्या घरी तयार करता येऊ शकते. जाणून घेऊया, तुळशीचे टोनर तयार करण्याची कृती.
सर्वप्रथम, गॅसवर एखादे भांडे गरम करत ठेवा. त्यात पाणी घालून एक उकळी येऊ द्या. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात तुळशीचे पाने धुवून घाला. आता त्यावर झाकण ठेवून उकळी येऊ द्या. 10 मिनिटानंतर गॅस बंद करा.हे पाणी चहाच्या गाळणीने गाळून घ्या. पाणी थंड झाल्यानंतर एका बॉटलमध्ये भरून घ्या. त्यात गुलाब जल, 1 चमचा ग्लिसरीन मिसळून टोनर तयार करा. हे टोनर वापरण्याकरिता तयार झाले आहे.
अशा पद्धतीने चेहऱ्यावर लावा टोनर
हा टोनर वापरण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या.चेहरा धुतल्यानंतर एका कापडाने पुसून घ्या. व हे टोनर चेहऱ्यावर स्प्रे करा.स्प्रे केल्यानंतर चेहरा कॉटन बॉलच्या मदतीने पुसटपणे पसरवा.टोनर सुकल्यानंतर त्यावर लोशन लावा.
तुळशी टोनरचे फायदे
– जर त्वचा सैल झाली असेल, चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागल्या असतील तर, तुळशीचा टोनर रोज वापरावा. यामुळे त्वचेचे छिद्र घट्ट होतील आणि त्वचा तरुण दिसेल.
– त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण दररोज तुळशीचा टोनर वापरू शकता. यामुळे उन्हात चेहऱ्यावर ओलावा राहील आणि त्वचा हायड्रेटेड दिसेल.




























































