प्लेलिस्ट – रोज शाम आती थी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> हर्षवर्धन दातार

आपण चर्चा करणार आहोत लताजींनी गायलेले ‘रोज शाम आती थी’ या गाण्याबद्दल. कॉलेजच्या मुख्याध्यापकाची मुलगी मधू (तनुजा) बरोबर प्रमोदच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात व्हायच्या वेळचे हे गाणे, कधी कधी आपल्या आयुष्यात अशी एक व्यक्ती येते आणि तिच्या येण्याने आपले आयुष्याच बदलून जाते.

सत्तरच्या दशकात एक नामवंत अभिनेता आपली वाटचाल बदलू पाहात होता. आतापर्यंत त्याने विरोधी, सहाय्यक किंवा खलनायकी छटा असलेले बरेच चित्रपट केले होते, मात्र 1974 मधील मदन सिन्हा दिग्दर्शित ‘इम्तिहान’ चित्रपटाने ही प्रतिमा बदलण्यात त्याची मदत केली. मूळ इंग्रजी चित्रपट ‘ऊद एग्r wग्tप् थ्दन’ या सिडनी पॉइंटरच्या भूमिकेने गाजलेल्या चित्रपटाची ही काही प्रमाणात भ्रष्ट आवृत्ती होती. यात विनोद खन्नाने नायक प्रोफेसर प्रमोद शर्माची भूमिका वठवली आहे. वडिलोपार्जित व्यवसाय आणि वडिलांच्या इच्छेला डावलून प्रमोद आपली वेगळी वाट धरतो. युवा पिढीला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेऊन तो
कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून येतो. आपल्या पेशाशी निष्ठा, चरित्रहननाचे आरोप आणि श्रद्धा अशा वेगवेगळय़ा अग्निपरीक्षातून मार्पामण करतो. दिसायला रुबाबदार, शिस्तीचा कडक, पण आपल्या विद्यार्थ्यांशी तितक्याच मनमोकळेपणे वागणारा शिक्षक ही भूमिका विनोद खन्नाने छान निभावून नेली आहे. चित्रपटाला माफक यश मिळाले असले तरी विनोद खन्नाची भूमिका आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे संगीत असलेली दोन गाणी मात्र बरीच गाजली, किशोर कुमारचे ‘रुक जाना नही…’ हे प्रेरणापर गाण्याचा आणि लोकप्रियतेचा निकष आजपर्यंत टिकवून आहे, मात्र आपण चर्चा करणार आहोत लताजींनी गायलेले ‘रोज शाम आती था…’ या गाण्याबद्दल. कॉलेजच्या मुख्याध्यापकाची मुलगी मधू (तनुजा) बरोबर प्रमोदच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात व्हायच्या वेळचे हे गाणे, कधी कधी आपल्या आयुष्यात अशी एक व्यक्ती येते आणि तिच्या येण्याने आपले आयुष्याच बदलून जाते. काही न बोलता केवळ त्या व्यक्तीच्या चाहुलीने आपण प्रफुल्लित होतो, मोहरून जातो. पूर्वीच्या दुःखद घटना आणि त्यातून होणाऱया वेदनेमुळे मधू (तनुजा) काहीशी अबोल आणि मनस्वी झाली आहे. प्रमोदच्या रूपाने तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा वसंत फुलत आहे. असाच प्रसंग प्रमोदच्या येण्याने मधुच्या बाबतीत घडतो आहे. एका संध्याकाळी, अस्त जाणाऱया सूर्याच्या साक्षीने आणि प्रमोदच्या सानिध्यात प्रेमाची हुरहूर, हवेहवेसे वाटणारे नाजूक क्षण तनुजानी पडद्यावर आणि लताजींनी त्यांच्या तारसप्तक गायकीतून सुरेख उभे केले आहेत.

पडद्यावर मधू आणि प्रमोद सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर उभे आहेत. गाण्याची सुरुवात पक्ष्यांची किलबिल, इराणी संतूरचे हलके सूर व फ्लूगेल हॉर्नच्या सुरावटीतून होते. एका क्षणिक अल्पविरामातून आणि पुढे लगेच येणाऱया लताजींच्या दीर्घ आलापातून पडद्यावरला क्षितिजाकडे जाणारा सूर्यास्त श्रोत्यांच्या मनात गाण्याचा मूड प्रस्थापित करतो.

रोज़ शाम आती थी मगर ऐसी न थी
रोज़ रोज़ घटा छाती थी मगर ऐसी न थी
ये आज मेरी ज़िन्दगी में कौन आ गया…

मधूच्या मनात एक प्रश्नचिन्ह आहे. आजची संध्याकाळ नेहमीपेक्षा वेगळी का वाटते आहे? आकाशावर नेहमी दाटणारे ढगही आज वेगळे का भासत आहेत? ही कोण व्यक्ती आज माझ्या आयुष्याच्या उंबरठय़ावर उभी आहे? लताजींचा सुरावटीतून आणि पार्श्वसंगीतातून गाण्याला एक सूक्ष्मशी गूढ किनार जाणवते.

डाली में ये किसका हाथ
करे इशारे बुलाए मुझे
झूमती चंचल हवा
छूके तन गुदगुदाए मुझे
हौले हौले धीरे धीरे
कोई गीत मुझको सुनाए
प्रीत मन में जगाई
खुली आँख सपने दिखाए…

मंद वाहणारा वारा जणू हलकेच मला हव्याहव्याशा वाटणाऱया गुदगुल्या करतो आहे. कुणीतरी माझ्या कानाशी हळुवार सुरात गाणे गुणगुणत आहे. मी जणू काही उघडय़ा डोळय़ांनी एक स्वप्नच बघते आहे. या फुलातून, पानातून मला कुणीतरी खुणावतंय, बोलावतंय आणि आज कुणीतरी माझ्या मनात प्रीतीची साद घालतंय. सगळं वातावरण मधूला आनंदित करते, मजरूह-एल पी-लताजी त्यांच्या गीत-संगीत-गायकीतून जणू प्रीतीचा सुंदर समा बांधतात. बाँगो आणि काँगो ड्रम्सची तालबद्ध लयकारी गाण्याचा खुमारी अधिकच वाढवते.

अरमानों का रंग है
जहां पलकें उठाती हूँ मै
हंस हँसके है देखति
जो भी मूरत बनाती हूँ मै…

जिथे बघावं तिथे सभोवताली संध्याकाळच्या या नारिंगी छटांमध्ये मला माझ्या इच्छा आकांक्षांच रंगीबेरंगी चित्र दिसतंय. जी कोणती छवी मी माझ्या मनात कोरते, ती माझ्याकडे बघून जणू काही पसंतीचे स्मितहास्य करतेय, चिडवतेय आणि मी त्या प्रेमाच्या रंगात आकंठ बुडून जातेय. शेवटच्या संगीताने (ज्दूत्ल्dा) अजूनच बहर आणला आहे. वाद्यमेळाच्या एकत्रित सुरांतून वातावरण आल्हाददायक होते.

हे संपूर्ण गाणे म्हणजे भावना, शब्द, संगीत, संयोजन आणि गायकीचा एक उत्सव आहे. मजरूह साहेबांचे सहज, सरळ आणि सोपे शब्द, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांची पाश्चात्य संगीत संयोजनावर आधारित संगीत रचना, इराणी संतूर, फ्लूगेल हॉर्न, बाँगो, काँगो, गिटार व्हायोलिन्स, चेल्लो (मत्त्द) अशा अनेक वाद्यांचा वाद्यमेळ आणि लताजींची गायकी यांनी या गाण्यात एक अनोखी रंगत आणली आहे. या गाण्याचे एकूण पाश्चात्त्य धर्तीचे संगीत संयोजन आणि वाद्यमेळ ऐकून अनेकांना या गाण्यात पंचमदाची (आर डी बर्मन) झलक दिसते. एल-पी जोडीची खासियत म्हणजे ते सध्या शब्दांनासुद्धा सुंदर चाल बांधून आकर्षक संयोजनाच्या कोंदणात बसवून सगळय़ांना आवडेल असे गाणे सादर करीत आणि म्हणून त्यांची गाणी सर्व थरातील श्रोत्यांच्या पसंतीस उतरते. हे गाणे आजही अतिशय लोकप्रिय आहे आणि अनेक वाद्यवृंदातून सादर केले जाते.

(लेखक संगीत अभ्यासक आहेत)