
आपल्या दिवसाची सुरुवात ही आंघोळ करून करतात. आंघोळ ही केवळ शरीर स्वच्छ करण्यासाठी केली जाते असं नव्हे.
तर नियमित आंघोळ केल्याने आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. सकाळी गरम पाण्याने आंघोळ केली की फ्रेश वाटतं आणि दिवसभर काम करण्यासाठीची उर्जा मिळते. तर अनेकदा रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करणंही समाधान देणारं असतं.
काहीजण गरम पाण्याने आंघोळ करणं पसंत करतात तर काही गार. गरम पाण्याने आंघोळ केल्याने थकवा दूर होतो. शरीराला आराम मिळतो. तर गार पाण्याने आंघोळ केल्याने अनेकांना फ्रेश वाटतं आणि एनर्जी येते. अनेकदा ठराविक वेळी थंड किंवा गार पाण्याने आंघोळ करण्याचे वेगवेगळे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला गरम आणि थंड पाण्याने आंघोळ करण्याचे काय फायदे आहेत हे सांगणार आहोत.
गरम पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे
1) चांगली झोप येण्यासाठी- तज्ञांच्या मते रात्री गरम पाण्याने आंघोळ केल्यास चांगली झोप लागण्यास मदत होते. दिवसभर काम केल्याने शरीर जड झालेलं असतं तसचं ते थकलेलं असतं. अशावेळी झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ केल्यास शरीर सैलावते आणि चांगली झोप लागते.
2) त्वचा उजळते- जेव्हा तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करता तेव्हा तुमच्या त्वचेवरील छिद्र खुली होतात. ज्यामुळे त्वचेतील घाण बाहेर निघण्यास मदत होते आणि त्वचा पूर्णपणे स्वच्छ होते. गरम पाण्याने आंघोळ केल्यास आपल्या त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते आणि ती स्वच्छ राहून उजळते.
3) हायपरटेंशनचा धोका कमी होतो- गरम पाण्याने आंघोळ करणं हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचं असतं. जनरल हार्टमध्ये प्रकाशित झालेल्या एका शोध अभ्यासानुसार रोज गरम पाण्याने अंघोळ करणं हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं असतं.. तसच गरम पाण्याने आंघोळ केल्याने उच्च रक्त दाबाची समस्या कमी होते.
4) डोकेदुखी कमी होते- गरम पाण्याने आंघोळ केल्यास डोकेदुखी कमी होऊ शकते. गरम पाण्याने आंघोळ केल्यास तणावामुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो.
5) अंगदुखी कमी करण्यासाठी- गरम पाण्याने आंघोळ केल्यास स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदना आणि अंगदुखी कमी होण्यास मदत होते. दिवसभर जर तुम्ही शारीरीक कष्टाचं काम केलं असेल किंवा वर्कआऊटनंतर काही वेळाने तुम्ही गरम पाणी अंगावर घेतलं तर तुम्हाला आराम जाणवेल. तसचं पाय दुखत असल्यास तुम्ही गरम पाण्यात पाय बुडवून बसल्यास तुम्हाला आराम वाटेल.
थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे
1) केस चमकतात त्वचा सॉफ्ट होते-
थंड पाण्यामुळे तुमच्या त्वचेवरील छिद्र घट्ट होतात. तसचं थंड पाण्याने केस धुतल्यास त्यातील नैसर्गिक तेल टिकून राहण्यास मदत होते आणि केस चमकदार दिसतात. तसचं थंड पाण्याने आंघोळ करणं त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करतं.
2) रक्त प्रवाह चांगला राहतो-
थंड पाण्याने आंघोळ केल्यास संपूर्ण शरीरातील रक्त प्रवाह वाढतो. त्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.
3) डिटॉक्सिफिकेशन-
थंड पाणी शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतं. सकाळी लवकर उठून थंड पाण्याने आंघोळ केल्यास तुमच्या शरीरातील घाण तसचं अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होईल.
4) तणाव कमी करणं-
थंड फवाऱ्यांमुळे कधीही आराम मिळतो आणि ताण कमी करण्यास मदत होते. तसचं थंड पाण्याचे फवारे तुमचा मूड चांगला करतात आणि नैराश्य कमी करण्यास मदत करतात. यामुळे आळस आणि थकवा दूर होते. यामुळे थंड पाण्याच्या शॉवरखाली आंघोळ घेतल्याने तुमचा तणाव कमी होवू शकतो.
5) वजन कमी करणे-
थंड पाण्याने आंघोळ करण्याचा आश्चर्यकारक फायदा म्हणजे वजन कमी होणे. थंड पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या कॅलरीज जलद बर्न होण्यास मदत होईल. यामुळे तुमची उर्जेची पातळी वाढते ज्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी होतो.



























































