
औरंगजेबाचे फोटो झळकावत नाचणाऱ्या, औरंगजेबाचे फोटो स्टेटसवर ठेवून त्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. असे असतानाच समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी एक वादग्रस्त ट्विट करत या वादात भर टाकली आहे. औरंगजेब एक धर्मनिरपेक्ष बादशाह होत. मी त्यांच्यासोबत आहे, असे ट्विट अबू आझमी यांनी केले आहे.
मैं औरंगज़ेब रहमतुल्लाह अलैह के साथ हूँ, उनका इतिहास देखोगे तो आप को पता चलेगा वो एक सेक्युलर बादशाह थे जिन्होंने अफ़ग़निस्ता से लेकर बर्मा तक भारतवर्ष बनाया था। इतिहास में ऐसे कई उदाहरण है जहाँ हिन्दू और मुस्लिम शासकों ने सत्ता चलाने के अलग फैसले लिए लेकिन आज उन्हें राजनितिक… pic.twitter.com/8nUtqhjQMP
— Abu Asim Azmi (@abuasimazmi) June 7, 2023
“मी औरंगजेबाच्या सोबत आहे. त्यांचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल ते एक धर्मनिरपेक्ष राजा होते. त्यांनी अफगाणिस्तानपासून बर्मापर्यंत भारत वाढवला होता. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे हिंदू आणि मुस्लिम राज्यकर्त्यांनी सत्ता चालवण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले, पण आज राजकीय फायद्यासाठी त्यांना धार्मिक रंग देऊन द्वेष पसरवला जात आहे, त्यात गोदी मीडियाचा मोठा हात आहे”, असं ट्विट अबू आझमी यांनी केलं आहे.
नगर येथे उरूस मिरवणुकीत औरंगजेबाचे पोस्टर झळकविल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी कोल्हापुरात काही युवकांनी त्याच पोस्टरचे वादग्रस्त स्टेटस आपल्या मोबाईलवर ठेवल्याचे उघड झाल्यानंतर संतप्त पडसाद उमटले. त्यामुळे त्या महाविद्यालयीन युवकांना त्वरित अटक करुन, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी मंगळवारी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यासह अनेक हिंदुत्ववादी संघटना व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.






























































