‘1 ओटीटी’वर मराठी कार्यक्रमांचा शुभारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा जमाना आहे. नवे ओटीटी प्लॅटफॉर्म आणि दर्जेदार पंटेंट प्रेक्षकांना आकर्षित करून घेत आहेत. अशातच ‘1 ओटीटी’ या बहुभाषिक ओटीटीच्या मराठी विभागाचा शुभारंभ नुकताच झाला. ‘1 ओटीटी’च्या सर्व संस्थापकांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. अभिनेता स्वप्नील जोशी ‘1 ओटीटी’चा सह-संस्थापक आणि ब्रँड चेहरा आहे.

लवकरच या व्यासपीठावर गुजराती, बंगाली, भोजपुरी अशा इतर प्रादेशिक भाषांमधले मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत. यासाठी बीटीएल ऑक्टिव्हेशन क्षेत्रातील  विनायक सातपुते, संस्थापक सदस्य वेंकटेश श्रीनिवासन, राजीव जानी, सतीश उतेकर आणि उद्योजक चेतन मणियार यांचे सहकार्य आहे.