
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आदित्य ठाकरे यांना विविध पक्षातील नेत्यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. त्यापैकी एक आमदार सत्यजीत तांबे यांच्या आदित्य ठाकरे यांना त्यांच्या कर्तुत्त्वाचा उल्लेख करत शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभेच्छा देताना तांबे यांनी आदित्य यांचा उल्लेख ‘प्रिय आदित्य’ असा केला आहे. ‘जेव्हा परिस्थिती आव्हानात्मक होते, तेव्हा आव्हानं पेलणाऱ्यांचं काम सुरू होतं, या उक्तीचं मूर्तिमंत उदाहरण तू आहेस’, अशा शब्दात सत्यजीत तांबे यांनी आदित्य ठाकरे यांना सदिच्छा दिल्या आहेत.
Happy birthday dear Aditya!
You have personified the saying “when the going gets tough, the tough gets going!
Keep it up! @AUThackeray— Satyajeet Tambe (@satyajeettambe) June 13, 2023




























































