नीट परीक्षेचा निकाल जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
MBBS Exam

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एमबीबीएस प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत महाराष्ट्रातील श्रीनिकेथ रवी याने देशात सातवा क्रमांक पटकावला आहे. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 18 लाख 72 हजार 334 विद्यार्थ्यांपैकी 11 लाख 45 हजार 976 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. आंध्र प्रदेशातील बोरा वरुण आणि तामीळनाडू येथील प्रबंजन जे याने 720 पैकी 720 गुणासह प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्राच्या तनिष्का भगत हिने 710 गुण मिळवत 27 वा क्रमांक मिळवला आहे. तसेच रिद्धी वाजरिंगकर हि 44 व्या क्रमांकावर आहे.