
जवळपास सर्वांनाच बाहेरचं खायला खूप आवडतं. खास करुन पाणीपुरी ही अनेकांची आवडती असते. लोक कधीही कुठेही पाणीपुरी खाऊ शकतात. बाकी खाद्य प्रकारांसारखंच पाणीपुरीमध्येही आता अनेक नवीन प्रकार पहायला मिळत आहेत. जवळपास सर्वांनाच बाहेरचं खायला खूप आवडतं. खास करुन पाणीपुरी ही अनेकांची आवडती असते. लोक कधीही कुठेही पाणीपुरी खाऊ शकतात. बाकी फूड प्रकारांसारखंच पाणीपुरीमध्येही आता अनेक नवीन प्रकार पहायला मिळत आहेत. नुकताच मार्केटमध्ये पाणीपुरीचा नवा प्रकार आला आहे. ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर गराळा घालत आहे.
तुम्ही आत्तापर्यंत पाणीपुरीचे अनेक प्रकार खाल्ले असतील. मात्र तुम्ही कधी नॉनव्हेज पाणीपुरी खाल्लीय का? कदाचित तुम्ही हे ऐकलंही पहिल्यांदाच असेल. सोशल मीडियावर सध्या पाणीपुरीच्या या मेन्युचा फोटो व्हायरल होतोय. हा फोटो अनेकांचं लक्ष वेधत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तु्म्ही पाहू शकता, पाणी पुरीचा मेन्यू दिसत आहे. मेन्युमध्ये चक्क चिकन आणि मटनची पाणीपुरी दिसत आहे. एक काळ असा होता की लोकांना आंबट-मसालेदार आणि गोड अशी पाणीपुरी आवडायची. मात्र पश्चिम बंगालमधील रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते या बाबतीत खूप पुढे गेल्याचे दिसत आहेत. इथे एक पाणीपुरी वाला भाऊ लोकांना चिकन आणि मटण सोबत पाणीपुरी देत आहे.
आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे लोकहीआवडीने खात आहेत. @MasalaBai नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. बंगालमधील एका दुकानाचा हा मेन्यु असल्याचं शेअर केलेल्या पोस्टवरुन समजत आहे. हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून पोस्टवर अनेक कमेंट येताना दिसत आहे




























































