रोज हळदीच्या पाण्याने चेहरा धुवा.. गोरापान रंग मिळवा..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

चेहऱ्यावर हळदीचे पाणी वापरल्याने पिंपल्स, काळे डाग, त्वचेची ॲलर्जी आणि टॅनिंग दूर होते. त्याचबरोबर यामुळे तुमचा रंग सुधारतो आणि त्वचा चमकदार होते, जाणून घेऊया हळदीच्या पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे. उन्हाळ्याचा हंगाम येताच तुमची त्वचा चिकट आणि काळी पडू लागते. यामुळे पिंपल्स, मुरुम, टॅनिंग अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मग या समस्या टाळण्यासाठी विविध प्रकारची ब्युटी प्रॉडक्ट्स वापरली जातात, पण त्यात केमिकल्स भरपूर प्रमाणात असतात, जे तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात. अशावेळी त्वचेची नैसर्गिक पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे. चेहऱ्यावर हळदीचे पाणी वापरल्याने रंग सुधारतो आणि त्वचा चमकदार होते.

हळदीचे पाणी कसे बनवायचे?
एका कढईत 1 ग्लास पाणी आणि 1 चमचा हळद घाला.
ते चांगले उकळून पूर्णपणे थंड होऊ द्या.
यानंतर तुम्ही ते चेहऱ्यावर लावून चांगले धुवून घ्या.

हळदीच्या पाण्याचे त्वचेसाठी फायदे
रोज झोपण्यापूर्वी हळदीच्या पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत होते. त्याचबरोबर चेहऱ्यावर नैसर्गिक चमकही येते.

प्राचीन काळापासून वधूच्या लग्नाच्या वेळी हळदीचा समावेश केला जातो. चेहऱ्यावर हळदीच्या पाण्याचा वापर केल्यास डाग दूर होतात. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्याचा रंगही सुधारतो

हळदीमध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे रोज हळदीच्या पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स आणि मुरुमांची समस्या दूर होण्यास सुरुवात होते.

हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात, त्यामुळे जर तुम्ही त्वचेसाठी हळदीच्या पाण्याचा वापर केला तर तुम्हाला चेहऱ्यावरील खाजेपासून सुटका मिळते.

हळदीचे पाणी कसे वापरावे?
रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीच्या पाण्याने चेहरा धुवा.
याच्या नियमित वापराने तुम्हाला आश्चर्यकारक फायदे दिसतील.