राज्यात 4464 तलाठ्यांची भरती, एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यात अर्ज करता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात सुमारे 4 हजार 464 तलाठी पदांच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱया परीक्षेकरिता प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका न काढता एकच प्रश्नपत्रिका काढली जाणार आहे. त्याचबरोबर एका परीक्षार्थी उमेदवाराला एकाच जिल्ह्यात अर्ज करून परीक्षेमध्ये भाग घेता येणार आहे.

राज्य शासनाने तलाठी संवर्गातील ‘क’ गटातील पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यास परवानगी दिली आहे. तलाठी भरतीसंदर्भातील प्रारूप आज जाहीर करण्यात आले. राज्यात एकूण 4 हजार 464 तलाठय़ांची पदे रिक्त असून, त्यासाठी ही भरती होणार आहे. राज्याच्या जमाबंदी आणि भूमिअभिलेख विभागाने येत्या 20 जूनपासून भरतीसाठी लिंक खुली करण्याकरिता परवानगी मागितली आहे. लिंक खुली झाल्यानंतर उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज भरता येतील.

यापूर्वी घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेमध्ये प्रत्येक जिह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका काढून परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी भूमिअभिलेख विभागाने भरती आणि परीक्षेची कार्यवाही करण्याचे काम टीसीएस कंपनीला दिले आहे. तलाठी भरतीसाठी घेण्यात येणाऱया परीक्षेकरिता अभ्यासक्रम निश्चित केला असून, संपूर्ण राज्यातील परीक्षार्थींसाठी एकच प्रश्नपत्रिका असेल. खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये, तर आरक्षित प्रवर्ग करताना 900 रुपये परीक्षा फी असणार आहे.

आदिवासी क्षेत्र असलेल्या बारा जिह्यांमध्ये पेसा अंतर्गत आदिवासी उमेदवारांकरिता लोकसंख्येवर आधारित आरक्षित जागा असतील. भरती परीक्षेसाठी लिंक ओपन झाल्यावर नोंदणी करण्यासाठी 21 दिवसांची मुदत असेल. पाच लाख विद्यार्थी ही परीक्षा देतील, असा अंदाज आहे. त्यासाठी 17 ऑगस्ट किंवा 12 सप्टेंबर यादिवशी परीक्षा घेण्याची तयारी दाखवण्यात आली आहे.

पुणे जिल्हय़ात 383 तलाठी भरणार

n पुणे जिल्हय़ातील 14 महसुली तालुक्यांमध्ये एकूण 383 तलाठय़ांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांचा अहवाल जमाबंदी आणि भूमिअभिलेख विभागाला जिल्हाधिकाऱयांनी पाठवला असून, 383 जागांसाठी पुणे जिल्हय़ात तलाठय़ांची भरती होईल.

तलाठी पदाच्या भरतीचे प्रारूप तयार आहे. भरतीसाठी होणाऱया परीक्षेकरिता अर्ज भरण्यासाठी लिंक खुली करण्यात वीस त्यानंतर 21 दिवसांची मुदत परीक्षा अर्ज भरण्यासाठी असेल. राज्यात एका जिह्यातून एका उमेदवाराला अर्ज भरता येईल. 20 जून दरम्यान ही लिंक खुली होईल, अशी शक्यता आहे.

– आनंद रायते (अतिरिक्त आयुक्त जमाबंदी आणि भूमिअभिलेख. पुणे )