
शिवसेनेचा 57वा स्थापना सोहळा मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी यावेळी उपस्थित नेते, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केलं. त्यांच्या भाषणातील काही प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे –
- तुम्ही जी मेहनत घेतलीत, ती वाया जाऊ देणार नाही. शिवरायांचा, शिवसेनेचा पवित्र भगवा पुन्हा एकदा आम्ही यांच्या छाताडावर रोवल्याशिवाय राहणार नाही.
- त्या सगळ्याच्या जोरावर आपण पुढची वाटचाल करतोय. आज 57 वर्षं पूर्ण होताहेत. या काळात असंख्य शिवसैनिक, नेते, ज्यांनी आपल्यासाठी कष्ट घेतले, आणि जे आपल्यात नाहीत, त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो.
- एक स्वाभिमानाचं, चांगलं, जिद्दीचं, निष्ठेचं, हिमतीचं पीक, बियाणं शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला दिलेलं आहे, ते बोगस बियाणं नाही.
- आमचं पीक कापून नेलं असेल तरी शेती आमच्याकडे आहे. पीक काढण्याची हिंमत शेतकऱ्याकडे असते म्हणून तो शेती करतो. नांगर त्याच्या हाती असतो, जास्त गडबड केली तर नांगरून टाकतो.
- गद्दारांना मला सांगायचंय की इतकी तसदी घेऊ नका, तुम्ही माझ्याकडे यादी पाठवा मी तुमच्याकडे पाठवतो.
- कारण, रोज फोन सुरू आहेत. तुम्हालाही सुद्धा सुरू असतील.
- डोक्यावरचा एक केस उपटला म्हणून अस्वल टकलं होत नाही. जे भाडोत्री आणि विकाऊ अजूनही कुणी असतील ते घेऊन जा.
- शिवसेना धक्काप्रुफ आहे. शिवसेना प्रमुखांनी मागेही सांगितलं होतं, घोणेचा एक पाय तुटला म्हणून घोण लंगडत नाही चालत.
- फक्त मला माध्यमांना सांगायचंय की, कुणीतरी जातो आणि लगेच शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना धक्का.. कसला धक्का?
- अजूनही काही जाताहेत, कालसुद्धा काही गेले, जाऊदेत.
- तुम्ही बाळासाहेबांचे फोटो चोराल, पण यांच्या मनातले आणि हृदयातले बाळासाहेब तुम्ही चोरू शकत नाही.
- कारण उद्धव ठाकरे एकटा नाही हा समोर बसलेला उद्धव ठाकरे आहे.
- कदाचित तुम्ही राम मंदिर बांधल्याचं फुकटचं श्रेय ढापाल. पण उद्धव ठाकरेचा जप करण्याऐवजी रामाचा जप केला तर राम कदाचित पावेल. तुम्ही जितका रामाचा जप करत नाही, तेवढे सगळे उद्धव ग्रस्त का झालात
- उद्या गद्दार दिन आहे. उद्या गद्दारीला एक वर्षं होईल. एका वर्षांत त्यांनी नाव चोरलं, पक्ष चोरला, माझे वडील चोरायला निघाले होते. आज उद्धव ठाकरेला काय किंमत आहे. पण तरीही अमित शहांना महाराष्ट्रात यावं लागतं आणि भाषणात सातत्याने माझा उल्लेख करावा लागतो.
- मला एका गोष्टीचा अभिमान आहे. शिवसेनाप्रमुखांचा पुत्र म्हटल्यानंतर नुसता गल्ल्यावर बसलाय असं नाहीये. जशी आव्हानं पेलली, पेलवली आणि तुमच्या साथीने परतवली, तसंच हे आव्हान मी तुमच्या सोबतीने परतवून लावल्याशिवाय राहणार नाही.
- हे आव्हान आपण मोडायचंच, मोडणारचं. आजवर अनेक आव्हानवीर आले, त्यांना आपण तोडून मोडून टाकलं. पण हे आव्हान मोडल्यानंतर आपल्याला आव्हान देणारा शत्रू आपण शिल्लक ठेवणार नाही.
- आताचं आव्हान आपल्यातल्या हरामखोरांनी तर दिलेलंच आहे. पण आपल्या एकेकाळच्या मित्राने दिलेलं आहे.
- मोबाईलमधल्या गेम सारखी आपल्या आव्हानाची लेव्हल वाढत जाणार आहे.
- शिवसेना आणि आव्हान हे वेगळे नाहीत. जिथे आव्हान आहे, तिथे शिवसेना आणि जिथे शिवसेना तिथे आव्हान असलंच पाहिजे.
- शिवसेनाप्रमुख आपली परीक्षा घेताहेत. ते असा विचार करत असतील की ज्यांच्यासाठी मी माझं जीवन उधळून टाकलं. अतिरेक्यांचं संकट, धमक्या हे भोगलं, सोसलं आणि त्यातून मी ही मर्द फौज उभी केली, ती या संकटाला कसं तोडून मोडून टाकतेय, ते बघताहेत.
- मी कधीच उमेद हरलेलो नाही, हरूच शकत नाही. पण, मला असं वाटतं की शिवसेना प्रमुख आपल्याकडे बघताहेत.
- तुमचे हात आणि पाय मजबूत ठेवायचे आहेत, आणि यांना जिथे मिळतील निवडणुकीत तिथे शेकून काढायचेत.
- पण ही वारेमाप सगळी उधळपट्टी सुरू आहे.
- यांनी जाहिरातीवर जेवढा खर्च केलाय, तेवढा जरी शेतकऱ्यांना दिला असता तरी शेतकरी खुश झाला असता.
- कारण, यांचं राज्य असेल आणि बळीराजावर संकट आलं तर मदत अजिबात होणार नाही.
- पाउस लवकर येऊ दे, बळीराजा खुश होऊ दे, बळीराजावर संकट येऊ नये म्हणून देवाला साकडं घालावं लागेल.
- पण मला खरंच आज पुन्हा एक हुरूप आला.
- भाजपला गरज असेल तेव्हा तुम्हाला दूध पाजतील, पुंगी वाजवतील नंतर टोपलीत घालून देतील सोडून
- आज आयत्या बिळावर फणा काढून बसलो म्हणजे नागोबा झालात असं तुम्हाला वाटत असेल.
- ही एकजूट 57 वर्षांची तपश्चर्या आहे. रक्त सांडून, घाम गाळून, मेहनतीने हे शिवसैनिक उभे राहिले आहेत. त्यांनी तुम्हाला उभं केलं होतं.
- हा सगळा अनुभव गाठीशी आहे त्यांच्या. एवढ्या गाठी आल्यात की आता त्यांचं करायचं काय
- सूरतला गेल्यावर कुठे राहाल, गुवाहाटीला गेल्यावर काय पाहाल, रेडा कुठे कापायचा, टेबलावर नाचायचं कुठे, दिल्लीत मुजरा कसा करायचा?
- कोर्टाचा निकाल लागल्यानंतर त्यांना फिरतीचा अनुभव उपयोगाला येईल कारण टूरिस्ट कंपनी काढायला चांगलं पडेल.
- चला कोण निघालंय गोरेगावला, तिथून सूरतला, तिथून गुवाहाटीला.
- शिवसेनेची सुरुवात झाल्यानंतर, मोठमोठ्या जाहिराती त्यावेळी नव्हत्या.
- त्यावेळी मार्मिक काढण्याचा उद्देश हाच होता की जो मराठी माणूस संघर्ष करतो, त्याच्या आयुष्यात हलकेफुलके क्षण यावेत म्हणून शिवसेनाप्रमुखांनी मार्मिक काढलं होतं.
- हे प्रेम भाडोत्री माणसांचं नाही. आणि ही सगळी गर्दी जी होते ती पैसे देऊन होत नाहीये
- काही लाचार मिंधे म्हणतील तुमच्या वकुबाप्रमाणे, पण तुम्हाला आमचा वकुब कळलेला नाही.
- त्यांनी ट्वीट केलं आहे. ही मन की बात नाहीये, मणिपूरची बात आहे.
- जसं मणिपूर पेटलंय आणि लष्कराचा मोठा अधिकारी धोक्याचा इशारा देतोय.
- आहे ताकद तर चीन जे करतोय, तिथे जा. तिथे शेपट्या घालताय आणि इकडे त्या शेपट्यांचे फणे काढून आमच्यावर येताय. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय घेऊन.
- हिंमत असेल तर देशाचे शत्रू संपवा, राजकारणातले शत्रू काय संपवताय?
- कश्मीरमध्ये, मणिपूरमध्ये हिंदू मारले जाताहेत आणि तुम्ही फक्त विरोधकांना संपवायच्या मागे लागला आहात.
- आमची फसगत झालेली आहे.
- जर तुम्ही 10 वर्षं सत्तेची गादी उबवून सुद्धा जर कश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत हिंदूना आक्रोश करावा लागत असेल तर तुम्ही सत्ता चालवायला नालायक आहात.
- त्यावेळी इस्लाम खतरें मे होता आता जर तुम्ही ताकदवान नेते बसल्यावर हिंदू आक्रोश करताहेत, याचा अर्थ तुम्ही सत्ता, सरकार, देश चालवायला लायक नाही आहात.
- राहुल गांधी मध्ये अमेरिकेत गेले होते, ते म्हणाले की, ब्रह्मदेव बाजूला बसले तर हे ब्रह्मदेवाला सांगतील की ब्रह्मांड कसं चालवायचं. मला ते पटतं कारण लस त्यांनी बनवली असेल तर नक्कीच ते ब्रह्मांड चालवतील.
- पण आता हे अंतराळगुरू, विश्वगुरूंचे विश्वगुरू, कारण त्यांनी लस बनवली.
- त्यावेळी कधी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढायची वेळ आली होती?
- आता हे दहा वर्ष, आता घोषणा काय होताहेत? मग हिंदुत्ववादी कोण, काँग्रेस की भाजप?
- नरसिंहराव, राजीव गांधी पंतप्रधान होते तेव्हा देशात आरोळ्या काय व्हायच्या? इस्लाम खतरें में है.
- काँग्रेसचा जमाना होता, तेव्हा आपली युती होती.
- दरवेळेला ते आपल्यावर टीकेचा प्रहार करतात, की आम्ही हिंदुत्व सोडलं का तर आम्ही काँग्रेससोबत गेलो.
- अशा या वातावरणात आपण पुढे जात आहोत.
- तुम्ही आमची झोप उडवली, सगळंच पळवली
- पण आता त्यांना सांगायला हवं की तुम्ही अवली असाल तरी जनता कावली आहे.
- एकापेक्षा एक अवली, लवली कुणीच नाही.
- मला वाटतं त्यांना समीर चौघुलेंच्या दवाखान्यात पाठवायला पाहिजे, समुपदेशनासाठी
- त्यांना वॅक्सिन देण्याची गरज आहे.
- हे असे सगळे अंधभक्त आणि त्यांचे गुरू, खरोखर त्यांना कोणतं वॅक्सिन द्यायचं ते आता ठरवावं लागेल.
- कुठून यांच्या डोक्यात व्हायरस घुसलाय तेच कळत नाही.
- कोविडची लस मोदींजीनी तयार केली, मग बाकीचे काय गवत उपटत बसले होते.
- नुसतं इतकं सांगितल्यावर तुम्ही हसताय, त्यांनी केलेला प्रयोग सांगितल्यावर आणखी हसाल.
- काल हास्यजत्रेचा आणखी एक प्रयोग राजकारणातल्या देवेंद्र फडणवीसांनी सादर केला.
- आम्ही राजकारणी, आमची हास्यजत्रा सुरूच असते.
- माझ्या देशातला एक भूभाग पेटलेला आहे. आणि तिथे तुम्ही जात नाही आहात. भाजपवाले असले तरी ते मारले जाता कामा नयेत, हे आमचं हिंदुत्व आहे.
- आम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे, भाजपवाले मार खाताहेत. पण तसं नाहीये.
- पण लीबियासारखी परिस्थिती म्हणजे केंद्रिय मंत्र्यांचं घर जाळलं. भाजप नेत्यांच्या घरावर हल्ले होताहेत, अशी परिस्थिती आहे.
- डबल इंजिन सरकार तिथे कोसळलेलं आहे, रुळावरून घसरलेलं आहे. अमित शहा म्हणजे एक इंजिन गेलं, दुसरं जातच नाहीये.
- डबल इंजिन सरकार, कुठेय डबल इंजिन. डबल इंजिन नुसतंच वाफा सोडतंय, पुढे जातच नाहीये.
- अशी परिस्थिती असल्याचं लेफ्टनंट जनरल सांगताहेत.
- तो गटाराच्या पाईपात लपला होता. बंडखोरांनी त्याचे केस ओढून, त्याला तुडवून तुडवून रस्त्यात मारला.
- लीबियामध्ये गद्दाफी हा हुकूमशहा होता. पण जनता पेटल्यानंतर हा हुकूमशहा पळाला आणि कुठे सापडला तुम्हाला कल्पना आहे?
- सीरिया, लिबिया, नामिबिया असं त्यांनी त्यात म्हटलं आहे. जनता पिसाळल्यानंतर काय होऊ शकते, ती उदाहरणं त्यांनी दिली आहेत.
- म्हणजेच मणिपूरमध्ये कायद्याचं राज्य संपुष्टात येऊन तिथे सीरियासारखी परिस्थिती झालेली आहे.
- मणिपूरमध्ये राहणारे रिटायर्ड लेफ्टनंट जनरल निशिकांत शेख यांनी ट्वीट करून मणिपूर हे स्टेटलेस स्टेट असल्याचं म्हटलं आहे.
- कोण सूर्य? कसला सूर्य? तुमच्या लेखी तुमचा गुरू सूर्य असेल तो मणिपूरमध्ये का उगवत नाही, मणिपूरमध्ये आपल्या सूर्याचा प्रकाश का पडत नाही? तिकडे जर उगवणार नसेल तर सूर्याचं करायचं काय?
- हे बोलल्यावर त्यांचे नवगुलाम झालेले आहेत, ते लाचार, मिंधे, त्यांनी सांगितलं की सूर्यावर थुंकू नका.
- कारण मणिपूर पेटलेलं आहे आणि आपले पंतप्रधान अमेरिकेत चाललेले आहेत.
- काल मी मणिपूरचा उल्लेख केला, माननीय पंतप्रधानांनी तिथे जायला पाहिजे.
- केवळ आणि केवळ दुसऱ्यांना छळायचं हा आनंद या विकृतांच्या लेखी झालेला आहे.
- पण मुख्य म्हणजे जगायचं कसं हे आपण विसरून गेलो आहोत.
- आपण काहीतरी बोललो की ते काहीतरी बोलणार, ते काहीतरी बोलले की आपण काहीतरी बोलणार
- आज बऱ्याच दिवसांनी आपल्या चेहऱ्याचा उपयोग हसण्यासाठी सुद्धा आहे, हे जाणवलं. नाहीतर नुसतं तूतू मैंमैं सुरू आहे.
- मी सगळ्या कलाकारांना खास धन्यवाद देतोय, आपण टीव्हीवर बघून हसत असतोच. पण शिवसैनिकांना, एकत्र इतक्या गर्दीला तुम्ही हसवलंत.
- आपल्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम काय ठेवायचा हा प्रश्न होता, आणि पटकन एकमत झालं हास्यजत्रा
- तशी गारदींची टोळी तिथे जमली आहे. इथे गर्दी आहे, तिथे गारदी आहेत.
- गारदीचा अर्थ पेशवेकाळात लढाईत गोंधळ घालायला, वसुली करायला भाडोत्री टोळ्या ठेवल्या जायच्या.
- मी गर्दी आणि गारदी हा हास्यजत्रेचा पंच म्हणून मारलेला नाही.
- मला वाटतं भाषणाची गरज नाही, इतके तुम्ही घट्ट निश्चय करून आलेला आहात.
- गारदी शब्दाचा अर्थ माहितीये? गारदी म्हटल्यावर नारायणराव, राघोबादा
- आपल्या शहरातल्या एका कोपऱ्यात जशी इथे गर्दी आहे, तसे तिकडे गारदी जमले आहेत.
- हॉल गच्च भरलेला आहे. कुणीही उठून जात नाहीये. कारण ही कडवट निष्ठावंत शिवसैनिकांची गर्दी आहे.
- आज मी इकडे पाहतोय आपल्या शिवसैनिकांची गर्दी आहे
- कोणाचा विश्वास बसणार नाही की आज आपल्या शिवसेनेला 57 वर्षं झाली आहेत. अजूनही 57वर्षांपूर्वी होता तसाच जोश, जल्लोष, ताकद, हिंमत जशीच्या तशी आहे.
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने सोहळ्याला सुरुवात
- महाराष्ट्राची हास्यजत्राच्या कलाकारांना मंचावर आमंत्रित करून सत्कार
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सत्कार संपन्न
- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात
- शिवसेनेच्या सत्तावन्नाव्या वर्धापन सोहळ्याचं आयोजन मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात करण्यात आलं आहे.




























































