
‘ऍशेस’ मालिकेतील पहिल्या कसोटी ऑस्ट्रेलिया डोक्यावर बर्फ ठेवून खेळला. यजमान इंग्लंडने ‘बॅझबॉल’ खेळ म्हणजेच आक्रमक खेळ दाखवला. पण एजबॅस्टन कसोटी फलंदाजीला पोषक असल्याने ऑस्ट्रेलियाने परिस्थितीचा लाभ उठवत नेहमीच इंग्लंडच्या पुढे राहण्याचा प्रयत्न केला. इंग्लंड आगीसारखे खेळले, पण ऑस्ट्रेलियन बर्फासारखे थंड खेळले आणि त्यांनी इंग्लिश आगीवर बर्फाचे पाणी ओतत त्यांना शांत केले. ऑस्ट्रेलियाने आपला पारंपरिकच बर्फासारखा थंड खेळ कायम ठेवत इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ क्रिकेटला हरवल्याचे हिंदुस्थानचा फिरकीवीर अश्विन म्हणाला.




























































