कणेकरी शैलीत तुफान फटकेबाजी, पत्रकार संघाचा पुरस्कार सोहळा रंगला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मी लेखन जरी मराठीत केले असले आणि माझी 55 पुस्तके प्रसिद्ध झाली असली तरी पत्रकारिता मात्र मी इंग्रजीतच केली. मी लिहू लागल्यावर वडिलांनी एकदा माझा लेख वाचून ‘तू फार छान लिहितोस’ असे म्हटले. वडिलांनी केलेले हे कौतुक मला मिळालेली सर्वात मोठी कॉम्प्लीमेंट होती, असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांनी काढले.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या 82 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या आठवणींना उजाळा देत कणेकरांनी प्रेक्षकांतून हशा वसूल केला. लतादीदी कशा दिलखुलासपणे पह्नवर गप्पा मारायच्या आणि राजेश खन्ना कसा रात्री-अपरात्री पह्न करून जाग आणायचा, हेदेखील कणेकरांनी खास कणेकरी शैलीत सांगितले. या सोहळय़ात वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या सुनील वागळे, विश्वास डिग्गीकर, श्रीकृष्ण राणे, डॉ. प्रकाश खांडगे, प्रदीप कोचरेकर, दिनेश गुणे, सिलवेस्टर मिनेजस, लीलाधर चव्हाण आणि भारत कदम या ज्येष्ठ पत्रकारांना कणेकर यांच्या हस्ते पत्रकार संघाचे सन्माननीय सदस्यत्व बहाल करण्यात आले. तर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांच्या हस्ते शिरीष कणेकर यांना सन्माननीय सदस्यत्व बहाल करण्यात आले. प्रारंभी कार्यवाह संदीप चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष शैलेंद्र शिर्पे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारिणी सदस्य राजेंद्र हुंजे यांनी केले.