
राज्य उत्पादन शुल्क किभागाच्या पंढरपूरच्या पथकाने वाखरी गावच्या हद्दीत एका पिकअपमध्ये जनावरांच्या चाऱ्यापाठीमागे ठेवलेल्या गोवा दारूच्या तीनशे बाटल्या जप्त केल्या. यावेळी कारवाईत नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर किभागाचे निरीक्षक किरण बिरादार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी बुधकारी काखरी (ता. पंढरपूर) गावच्या हद्दीत वाखरी-गादेगाव रस्त्याकर सापळा रचला, त्यावेळी तेथे एक पिकअप वाहन येताना त्याला पथकाने अडविण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तो चालक गाडी सोडून पळाला. पिकअपची तपासणी केली असता, त्यामध्ये जनावराच्या चाऱ्याआड गोवा दारूच्या पेटय़ा लपविल्याचे दिसून आले. 25 कागदी बॉक्समध्ये 300 बाटल्या आढळून आल्याने गुन्हा नोंदविण्यात आला असून, फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. ही कारकाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किरण बिरादार, जीकन मुंढे, गणेश रोडे आदिंनी पार पाडली.
आषाढी वारीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली असून, अवैध दारूविक्री, निर्मिती, वाहतुकीकर करडी नजर ठेवण्यात येत आहे. तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध दारूबाबत माहिती मिळाल्यास या विभागास संपर्क साधावा. -किरण बिरादार, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पंढरपूर विभाग.






























































