
आम आदमी पक्षाने (आप) आज एकसमान नागरी संहितेला आपला ‘तत्त्वतः पाठिंबा’ दर्शवला आहे. परंतु केंद्र सरकारने सर्वांशी सल्लामसलत केल्यानंतर सहमतीने आणले पाहिजे’ असं म्हटलं आहे.
‘सरकारनं राजकीय पक्ष आणि गैर-राजकीय घटकांसह सर्वांसोबत प्रस्तावावर विस्तृत सल्लामसलत केली पाहिजे’, असे आपचे राष्ट्रीय सरचिटणीस संदीप पाठक म्हणाले.
पाठक यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाला सांगितले की, ‘आम आदमी पार्टी यूसीसीला तत्त्वतः समर्थन देते. कलम 44 (संविधानाचे) देखील त्यास समर्थन देते’.
पण सरकारने समान नागरी संहिता तेव्हाच आणली पाहिजे जेव्हा संबंधितांमध्ये एकमत असेल, असं ते म्हणाले.
‘आमचा विश्वास आहे की अशा मुद्द्यांवर आपण एकमताने पुढे जावे. आमचा असा विश्वास आहे की सर्वांमध्ये एकमत झाल्यानंतरच हे (यूसीसी) लागू केले जावे’, असं पाठक म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी समान नागरी संहितेसाठीचं विधान केल्यानंतर यासंदर्भातील चर्चांना उधाण आणली आहे.
























































