
दिल्ली कॅपिटल्सच्या सहाय्यक प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयच्या निवड समिती अध्यक्षपदाचा अर्ज भरणारा अजित आगरकरच भावी अध्यक्ष असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. निवड समिती अध्यक्षपदावरून चेतन शर्मा यांना हटवल्यानंतर शिवसुंदर दास यांना प्रभारी करण्यात आले होते. मात्र आता बीसीसीआयने संघनिवड समिती अध्यक्षपदासाठी मागवण्यात आलेल्या अर्जांमध्ये आगरकरसह दिलीप वेंगसरकर व रवी शास्त्री यांचेही अर्ज असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे, मात्र त्यांनी अर्ज भरल्याच्या वृताला कुणीही दुजोरा दिलेला नाही. अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याचा शुक्रवार, 30 जून शेवटचा दिवस असल्यामुळे आणखी कुणाचे अर्ज येताहेत, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
संघनिवड समिती अध्यक्षपदासाठी ‘बीसीसीआय’ने 60 वर्षांची वयोमर्यादा शिथील केल्यामुळे रवी शास्त्राr यांच्या नावाच्या चर्चेला अक्षरशः उधाण आले आहे. मात्र अजित आगरकर यांनी दिल्ली कॅपिटल्सचे पद सोडल्याने निवड समितीचा कारभार त्याच्याच हात असेल, असे अंदाज बांधले जात आहेत. मात्र वेंगसरकर यांनी यापूर्वीही निवड समिती अध्यक्ष होते ते एक वर्षच असू शकतात.
नव्या अध्यक्षांचा पगार एक कोटीपेक्षा अधिक
निवड समितीच्या शर्यतीत आगरकर आल्यामुळे आता अध्यक्षांचा वार्षिक पगार एक कोटीपेक्षा अधिक आणि अन्य सदस्यांचा वार्षिक पगार 90 लाखांपेक्षा अधिक करावा लागणार असल्याचे समोर आले आहे. आगरकर कार्यरत असलेल्या दिल्ली पॅपिटल्समध्ये त्याचा पगार बीसीसीआय अध्यक्षांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे बीसीसीआयला पगारवाढीबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.




























































