माढ्यात पावसाची दमदार हजेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आतापर्यंत हुलकावणी दिलेल्या पावसाने काल माढा तालुक्यात दमदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत होता. काल झालेल्या दमदार पावसाने शेतकऱयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

माढा शहर आणि परिसरात संध्याकाळी सहा वाजता सुरू झालेला पाऊस दोन तास बरसत होता. पावसाने ओढ दिल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. जनावरांना चारा, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पाण्याअभावी कित्येक एकर ऊस जागेवर जळून जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला होता.

मंडलनिहाय पाऊस : माढा 29.7 मि.मी., म्हैसगाव 17.3, दारफळ 32.2, रोपळे क 27.3, कुर्डूवाडी 12.4, टेंभुर्णी 22.3, रांझनी 42.00, मोडनिंब 18.1, लऊळ 2.4 मि.मी.