देवगडमध्ये विविध मार्गावर पाणी तुंबले, निचरा न झाल्याने पादचाऱ्यांचा होतोय संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवगड जामसांडे नगरपंचायत हद्दीतील फाटक क्लास ,श्रीकृष्ण नगर ,गणेश नगर या मार्गावर तुंबणारे पावसाच्या पुराच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता देवगड जामसंडे नगरपंचायत प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम खाते यांना अपयश आले आहे. दुचाकी चार चाकी गाड्यांसह पादचाऱ्यांना या पुराच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे या पुराच्या पाण्यात लहान मोठे अपघात होण्याचे प्रसंग निर्माण होऊ लागले आहेत. याकडे स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने पाहावे व यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

दरम्यान मंगळवारी रात्री साडेनऊ वाजल्यापासून बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत देवगड व आजूबाजूच्या परिसरात पडलेल्या एकूण पावसाची नोंद 223 मिलिमीटर एवढी झाली असून आत्तापर्यंत देवगड तालुक्यात एकूण 870 मिमी पावसाची नोंद झाली आहे या मुसळधार पावसात हडपीड येथील सुनील दत्तराम साळसकर यांचे घर घराची पडझड होऊन सुमारे 10 हजार 300 रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद महसूल प्रशासनाकडे करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मंगळवारी रात्री 9.30 वाजल्यापासून बुधवारी सकाळ 10 वाजेपर्यंत देवगड व आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसाने थैमान घातले असून या मुसळधार पावसाने ठिकठिकाणी मुख्य मार्गावर पाणी साचण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. देवगड विजयदुर्ग मार्गावर वाडा येथे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून प्रसंगी काही काळ या मार्गावरून होणारी प्रवासी वाहतूक तसेच खाजगी वाहनांची वाहतूक पूर्णपणे कोलमडली होती. त्याचबरोबर देवगड कुणकेश्वर मार्गावरील पाटथर दहीबाव नारिंग्रे या ठिकाणी पुराचे पाणी वाढल्याने त्या मार्गावरील वाहतुकी पूर्णपणे ठप्प झाली. प्रसंगी या पुराच्या पाण्याचा फटका विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयांमध्ये येण्यासाठी मोठ्या प्रमाणात बसला. याबरोबरच देवगड जामसांडे नगरपंचायत हद्दीतील जामसांडे पेट्रोल पंप, फाटक क्लास ,श्रीकृष्ण नगर, गणेश नगर पर्यंत चा भाग हा गेली कित्येक वर्ष वारंवार पावसाळ्याच्या पाण्याने वेढला जातो व त्याचा परिणाम देवगड निपाणी महामार्गावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात येते गेली दहा वर्ष याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून या नगरपंचायत हद्दीतील परिसरात यापूर्वी गेल्या काही महिन्यात काही कालावधीत नवीन इमारतींची बांधकामे पूर्ण करण्यात आली आहे प्रसंगी ही बांधकामे करीत असताना ठीक ठिकाणी घातलेल्या मातीचा भराव त्यामुळे त्या ठिकठिकाणी साचणारे पाणी हे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा येते. गटारांची व्यवस्था नसल्यामुळे प्रसंगी या मार्गावरून वाहून जाणाऱ्या पाण्याकरता नैसर्गिक वहाळ नाहीत. पूर्वी वाहळ होते ते पूर्णतः बुजविण्यात आल्याने त्या या मार्गावर पाण्याचा प्रवाह हा पूर्णतः बदलला व पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर नजीकच्या आजूबाजूच्या परिसरातून येणारे पाणी पूर्णपणे फाटकलास गणेश नगर श्रीकृष्ण नगरच्या परिसरात रस्त्यावर साचते.

या साचलेल्या पाण्यातून दुचाकी स्वार व चार चाकी स्वाऱ्यांना प्रसंगी पादचारांना चालणे देखील फार अवघड होते असाच प्रकारचा परिणाम मंगळवारी पडलेल्या संत जात पावसामुळे ठिकठिकाणी प्रचंड प्रमाणात पाणीसाठले प्रसंगी दुचाकी स्वरांना छोट्या मोठ्या प्रमाणात अपघातांना सामोरे जावे लागले याकडे प्रशासनानेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी देखील याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास हा निश्चितपणे कमी होईल तसं या संपूर्ण मार्गाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे प्रसंगी आगामी काळात नागरिकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनप्रक्षोभ या पावसाळी हंगामात साचनाऱ्या पाण्यामुळे होऊ शकतो अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी यावर तात्काळ उपाय योजना करण्यात यावी परंतु नगरपंचायत प्रशासनामार्फत संबंधित इमारतींच्या विकासाला आवश्यक ती नोटिसा बजावण्यात आली असून नैसर्गिक पाणी जाण्याचे मार्ग हे खुले करावे अशा पद्धतीची सूचना देण्यात आले असल्याची माहिती समजते परंतु यावर अद्यापही कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही विकासकाम मार्फत करण्यात आलेली नाही