
इंग्लंडची माजी क्रिकेटपटू सारा टेलर हिच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. साराची समलैंगिक जोडीदार डियाना हिने मुलाला जन्म दिला आहे. साराने डियानासोबत फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
या बाळाचं नाव लॉरी ठेवत असल्याचं तिने या फोटोतून जाहीर केलं आहे. या आठवड्यात लहानग्यासह खूप आनंदात दिवस व्यतित केले. तुझं या जगात स्वागत आहे लॉरी. डियाना तुम्ही दोघं माझं जग आहात. मला तुमचा अभिमान वाटतो, अशी कॅप्शनही तिने फोटोखाली दिली आहे. या पोस्टखाली हिंदुस्थानी क्रिकेटपटून जेमिमा रॉड्रिग्ज हिने शुभेच्छा दिल्या आहेत.
सारा टेलर ही महिला क्रिकेट विश्वातली एक दिग्गज क्रिकेटपटू आहे. तिने सप्टेंबर 2019मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली होती. त्यापूर्वी तिने मानसिक स्वास्थ्यासाठी मार्च 2016मध्ये खेळातून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, 2017मध्ये विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या संघाचं नेतृत्व तिने केलं होतं. तिच्या नावे कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 स्पर्धा मिळून अनुक्रमे 300, 4056 आणि 2177 धावांची नोंद आहे. यात सात शतकं आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे.
View this post on Instagram

























































