
प्रसिद्ध चित्रपट निर्माते मोझेझ सिंग यांनी अलीकडेच हिंदुस्थानचा रॅपर आणि हिप हॉप कलाकार यो-यो हनी सिंग याच्या जीवनावर आणि प्रवासावर असलेल्या फीचर फिल्मवरील मुख्य शूट पूर्ण केलं आहे.
शेफाली शाह आणि कीर्ती कुल्हारी यांचा अभिनय असलेला ‘ह्यूमन’ ही वेब सिरीज तयार केल्यानंतर या दिग्दर्शकाने त्याच्या या अनोख्या प्रोजेक्ट्च शूट पूर्ण केलं. त्यांनी विकी कौशलची भूमिका असलेल्या झुबानचे दिग्दर्शनही केले आहे ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद दिला होता. दिग्दर्शकाला या माहितीपटाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, “या माहितीपटावर काम करणे हा माझ्यासाठी सर्वात आनंददायी अनुभव होता. योयो हनी सिंगचे जग म्हणजे रोलर कोस्टर राईड ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात क्रिएटिव्ह राईड आहे आणि डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग चा पहिला अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.
याचा टीझर आधीच आऊट झाला असून ही डॉक्युमेंटरी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. या डॉक्युमेंटरी व्यतिरिक्त दिग्दर्शक मोझेझ सिंग लवकरच त्याच्या पुढील फीचर फिल्मवर काम करण्यास सुरवात करणार असल्याचे सांगितले.

























































