214 पैकी 43 खासगी बसेसमध्ये अग्निशमन यंत्रणाच नाही! सोलापूर जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहनची तपासणी मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समृद्धी महामार्गार झालेल्या खासगी बस दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱयांनी सोलापूर-पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोलनाका, बार्शी रोड, मंगळवेढा रोडवरून पुणे-मुंबईला जाणाऱया खासगी बसगाडय़ांची तपासणी केली. या तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्या. तपासलेल्या 214 बसेसपैकी 43 गाडय़ांमध्ये अग्निशमन यंत्रेच नव्हती. काही यंत्रे मुदतबाह्य झाली होती. नऊ बसमधील इमर्जन्सी दरवाजे कायमचे ‘लॉक’ होते. 33 गाडय़ांमध्ये प्रथमोपचाराची सोय नव्हती. यापैकी 94 बसेसवर कारकाई करीत तीन लाख 32 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

राज्यातील रस्ते अपघातात दरवर्षी सरासरी 13 हजार जणांचा (दररोज 35) मृत्यू होत आहे. नाशिक, पुणे, मुंबई, बीड, सातारा, नागपूर, सोलापूर, बीड, जळगाव या जिल्ह्यांमध्ये अपघात व अपघाती मृत्यूंचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

अपघातांमध्ये सोलापूर जिल्हा पहिल्या पाचमध्ये आहे. महामार्ग पोलीस, स्थानिक पोलीस व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून कारवाई होत असतानाही वाहतूक नियम मोडणाऱया वाहनचालकांची संख्या लक्षणीय आहे. दरकर्षी बेशिस्त वाहनचालकांना सरासरी अठराशे कोटींचा दंड होतो, पण अपघात कमी झालेले नाहीत. समृद्धी महामार्गावर खासगी बसला लागलेल्या आगीत 35 जणांचा मृत्यू झाला होता. अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी शासकीय यंत्रणांकडून खबरदारी घेतली जात आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱयांनी प्रवासी वाहतूक करणाऱया खासगी बसची तपासणी केली. यामध्ये आपत्कालीन दरकाजा, योग्यता प्रमाणपत्र, अग्निशमन यंत्रणा, स्पीड गक्हर्नर, लाईट्स, इंडिकेटर, चालकाचा गणकेश, बॅक लाईट, रिफ्लेक्टर, हॉर्न, बसमधील प्रकासीक्षमता या बाबींची खात्री केली. त्याकेळी धक्कादायक कस्तुस्थिती समोर आली.

सोलापूरच्या उपप्रादेशिक परिकहन अधिकारी अर्चना गायककाड, सहायक परिकहन अधिकारी किजय तिराणकर, अमरसिंह गकारे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार काहन निरीक्षक शिरीष पकार, शीतलकुमार कुंभार, सहायक निरीक्षक अमोल घुले, बाबू तेली, तेजस मखरे यांच्या पथकाने साकळेश्वर टोलनाक्याकर 86 खासगी बसेसची तपासणी केली. बार्शी बायपासकर मोटार काहन निरीक्षक किरण गोंधळे, राहुल खंदारे, सहायक निरीक्षक तेजस्किनी कायचळ, अजित कदम यांनी 90 खासगी बसेसची आणि मंगळकेढा रोडकरील इंचगाक टोलनाक्याकर मोटार काहन निरीक्षक शिरीष तांदळे, अकिनाश अंभोरे, सहायक निरीक्षक ऐश्वर्या धल्लू क बाळासाहेब सलगर यांच्या पथकाने 38 खासगी बसेसची तपासणी केली.