
उत्तम कूकिंग कौशल्य असलेल्या प्रतिभावंतांना मास्टरशेफ इंडिया या प्रसिद्ध कूकिंग रिऑलिटी शोमध्ये सहभागी होण्याची संधी आहे. होम कूक असो किंवा किचनमध्ये प्रयोग करण्याची आवड असणारी व्यक्ती मास्टरशेफ इंडियामध्ये सहभागी होऊन पाककला विश्वात स्वतःचा ठसा उमटवू शकते.
यासाठी इच्छुकांनी सोनी लिव्ह ऍपवर अर्ज करता येईल. फक्त एवढेच नाही, इन्स्टाग्रामवरील नवीन मास्टरशेफ इंडिया फिल्टरचा वापर करत तुम्ही आता शोमध्ये तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबातील सदस्यांना नॉमिनेट करू शकतात, जे तुमच्या मते शोमध्ये स्पर्धेत उतरण्यास सक्षम आहेत.
‘मास्टरशेफ इंडिया’च्या माध्यमातून प्रतिष्ठत शेफकडून शिकण्याची, बहुमूल्य मार्गदर्शन मिळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पाककलाप्रेमींनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



























































