सांगली जिल्ह्यातील 86 ग्रामपंचायतींचे अंतिम आरक्षण जाहीर, आज जाहीर होणार अधिसूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सांगली जिल्ह्यातील 86 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप, नमुना ‘ब’ 26 जून रोजी सर्व ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय स्तरावर तसेच NIC Website वर तसेच स्थानिक दैनिक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. परिशिष्ट 16 मधील अधिसूचना, नमुना ‘अ’ आज (दि. 14) अंतिमरीत्या प्रसिद्ध करणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी दिली.

कवठे महांकाळ तालुक्यातील मौजे घोरपडी व खानापूर तालुक्यातील मौजे भेंडवडे येथील एक हरकत प्राप्त झाली होती. त्यापैकी मौजे घोरपडी येथील हरकत मान्य केली असून, मौजे भेंडवडे येथील हरकत अमान्य केली आहे. उर्वरित 84 ग्रामपंचायतींमध्ये आरक्षणासंदर्भात कोणत्याही हरकती प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे आयोगाने निश्चित करून दिलेल्या कार्यक्रमानुसार 12 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांनी मान्यता देऊन त्यानुसार तालुकानिहाय एकूण 86 गावांचे अंतिम आरक्षण परिशिष्ट 16, नमुना ‘अ’ 14 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अंतिम आरक्षणानुसार गावे पुढीलप्रमाणे – मिरज – का.खोतवाडी, निलजी बामणी, वाजेगाव. तासगाव – चिखलगोठण, बिरणवाडी. जत – गुलगुंजनाळ, को. बोबलाद, कोणबर्गी, बिळूर, खिलारवाडी. कवठे महांकाळ – बसाप्पाचीवाडी, दुधेभावी, गर्जेवाडी, करलहट्टी, पिंपळवाडी, रामपूरवाडी, देशिंग, धुळगाव, घोरपडी, करोली टी, कोकळे, शिंदेवाडी (जी), ढोलेवाडी, ढालगाव, कदमवाडी, कुंडलापूर, मोरगाव, जाधववाडी, झुरेवाडी. खानापूर- विटा – देवनगर, भेंडवडे, साळशिंगे. आटपाडी – नेलकरंजी, वाक्षेवाडी, काळेवाडी, मानेवाडी, मासाळवाडी, मिटकी, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, बनपुरी, करगणी, मुढेवाडी, निंबवडे, पूजारवाडी आ, विभुतवाडी, औटेवाडी, कानकात्रेवाडी. पलूस – राडेवाडी, आमणापूर, विठ्ठलवाडी. वाळवा – तांबवे, शिरटे, साटपेवाडी, कारंदवाडी. कडेगाव – वाजेगाव, चिंचणी वांगी. शिराळा – बांबवडे, वाकुर्डे बु., भाटशिरगाव, धसवाडी, करुगली, खुजगांव, मादळगाव, रांजणवाडी, रिळे, शिरशी, आंबेवाडी, बेलेवाडी, फकीरवाडी, खराळे, कुसाईवाडी, सावंतवाडी, शिरसटवाडी, चिखलवाडी, अस्वलेवाडी, चिंचेवाडी, इंगरूळ, कुसळेवाडी, मराठेवाडी, मेणी, मोरेवाडी, पं.त. वारूण, पाचगणी, मानेवाडी, कदमवाडी