चुकीच्या उपचारांमुळे अशी अवस्था झाली, अतुल परचुरेंनी सांगितली आपबीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी अभिनेते अतुल परचुरे यांनी हिंदी-मराठी सिनेमा, नाटकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले. काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोग असल्याचे निदान झाले आणि त्यानंतर कर्करोगाशी त्यांची झुंज सुरू झाली. त्यानंतर येणारा प्रत्येक दिवस, अनुभव याबाबत त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत उलगडा केला आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर ते यातून कर्करोगमुक्त होऊन बाहेर पडले.

नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, माझ्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली होती. जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियाला आणि न्यूझीलंडला गेलो त्यावेळी बरा होता. पण काही दिवसानंतर मला काहीच खाण्याची इच्छा होत नव्हती. त्यामुळे काहीतरी गडबड आहे असे सतत वाटू लागले होते. त्य़ानंतर डॉक्टरांनी काही औषधं दिली पण त्याचाही काही फायदा झालेला नाही. अनेक डॉक्टरांकडे गेल्यानंतर मला अल्ट्रासोनोग्राफी करायला सांगितली. जेव्हा डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून काहीतरी गंभीर असल्याचे जाणवले आणि मला विश्वास बसला की, काहीतरी गडबड आहे. त्यांनी मला सांगितले की, त्यांच्या यकृतात 5 सेमीची गाठ आहे आणि ती कर्करोगाची गाठ आहे. मी त्यांना विचारले मी बरा होईन का यातून आणि त्यांनी सांगितले हो तुम्ही बरे व्हाल असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र उपचाराचे माझ्यावर परिणाम झाला आणि माझी तब्येत आणखी बिघडली.

पुढे ते म्हणाले की, , ” कर्करोग असल्याचे कळल्यानंतर पहिलेच उपचार चुकीचे झाले. माझ्या स्वादुपिंडावर त्याचा परिणाम झाला आणि चुकीच्या उपचारांमुळे प्रकृती आणखी बिघडली. त्यामुळे एवढा परिणाम झाला की, मला धड चालताही येत नव्हते. बोलताना अडखळायचो. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी मला दीड महिना वाट पाहण्यास सांगितले. त्यांनी सांगितले की या अवस्थेत शस्त्रक्रिया केल्यास त्यांना वर्षानुवर्षे कावीळ होईल आणि माझे यकृत पाण्याने भरले जाईल किंवा मी जगू शकणार नाही. पण त्या नंतर मी डॉक्टर बदलले आणि योग्य औषधे घेतली. आणि केमोथेरपी घेतल्याचे त्यांनी सांगितले”.

परचुरे यांनी सांगितले की, अनेक वर्ष ते द कपिल शर्मा शो चा भाग होते. मात्र प्रकृतीमुळे त्यांना त्यांच्यासोबत काम करता आले नाही आणि नाहीतर त्यांच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर त्यांच्यासोबत जाऊ शकलो असतो. “मी अनेक वर्षांपासून कपिल शर्मा करत आहे. त्यांनी मला सुमोनाच्या वडिलांच्या भूमिकेसाठी बोलावले. माझ्या कर्करोगामुळे मी त्या एपिसोडमध्ये परफॉर्म करू शकलो नाही. मी कपिलसोबत आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर जाऊ शकलो असतो. पण लवकरच मला कळेल मी पूर्णपणे बरा झालो आहे की नाही हे कळेल. अतुल परचुरे यांनी आर.के. लक्ष्मण की दुनिया, कॉमेडी नाईट्स विथ कपिल, जागो मोहन प्यारे आणि भागो मोहन प्यारे यांसारख्या अनेक शोमध्ये दिसला आहे.