विजय तेंडुलकर यांच्या नाटकावर आधारित…‘पाहिजे जातीचे’ लवकरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘वाचायला शिका, विचार करायला शिका आणि महत्त्वाचं म्हणजे प्रश्न विचारायला शिका’ अशी शिकवण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. याच शिकवणीचा धागा पकडत ज्येष्ठ लेखक विजय तेंडुलकर यांनी ‘पाहिजे जातीचे’ हे  नाटक लिहिले. या नाटकावर आधारित ‘पाहिजे जातीचे’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला. ‘पाहिजे जातीचे’ चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, विक्रम गजरे, संजना काळे  मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर भाष्य करणारा आणि प्रश्न विचारणारा आहे.  आजच्या काळातही जातीच्या एका लेबलमुळे होतकरू मुलांचे आयुष्य धुळीस मिळण्याचे मोठे प्रमाण दिसून येते. त्यामुळे जातीपातीत न अडकता केवळ हुशारी आणि गुणांच्या जोरावर प्रगती केली पाहिजे, ही शिकवण यातून मिळणार आहे.