
हिंदुस्थानच्या लष्करी तळांची महत्त्वपूर्ण माहिती पाकिस्तानमधील आयएसआय अधिकाऱयांना पुरवणाऱया रईस या आयएसआयच्या संशयित हस्तकाला रविवारी येथे अटक करण्यात आली.
अरमान या मुंबईस्थित व्यक्तीने रईसला हिंदुस्थानविरोधात हेरगिरी करण्यासाठी तयार केले होते. पैसे आणि दुबईत नोकरी असे आमिषही त्याला एका पाकिस्तानी नागरिकाने दाखवले होते, असे विशेष महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले.
2022 मध्ये एका विदेशी क्रमांकावरून आलेल्या व्हॉट्सऍप कॉलवर रईसला हुसेन याच्याशी संपर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर हिंदुस्थानच्या प्रमुख लष्करी तळांची छायाचित्रे पाठवण्यास त्याला सांगण्यात आले. फोटो पाठवण्यासाठी रईसला 15 हजार रुपये देण्यात आले होते. बांगलादेशमध्ये नोंदवलेल्या एका मोबाईल क्रमांकाद्वारे तो आयएसआय अधिकाऱयांच्या संपर्कात होता. लखनौ एटीएसने रईसविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सलमान नावाचा एक तरुण आणि आणखी एका अज्ञात व्यक्तीचा पोलीस या प्रकरणात शोध घेत आहेत.



























































