WhatsApp नंतर Instagram ही डाऊन; 24 तासात मेटाला दुसरा झटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यासाठी लोकप्रिय असलेला सोशल मिडीयावरील Instagram गुरुवारी दुपारी अचानक डाऊन झाले. त्यामुळे अनेक युजर्सची अडचण झाली. याआधी बुधवारी रात्री लोकप्रिय मेसेजिंग अॅप whatsapp अचानक बंद पडले होते. त्यामुळे युजर्संना मसेज पाठवता येत नव्हते किंवा कोणतेही मेसेज येत नव्हते. 24 तासात मेटाच्या whatsapp आणि instagram या दोन्ही सेवा डाऊन झाल्याने मेटाला मोठा फटका बसला आहे.

अनेक युजर्सने या सेवा ठप्प पडल्याची माहिती ट्विटरवर दिली. तसेच ट्विटरवर #instagramdown ट्रेंड सुरू होता. अनेकांनी या हॅशटॅगचा वापर करत इंस्टाग्राम सेवा वापरता येत नसल्याच्या तक्रारी केल्या. आऊटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाऊन डिटेक्टर इंस्टाग्राम सेवा डाऊन असल्याची माहिती दिली आहे. अनेक युजर्सने याबाबतची माहिती दिली आहे. या सेवा गुरुवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास ठप्प पडल्या. त्यानंतर सोशल मिडीयावर याबाबतच्या तक्रारींचा पाऊस पडायला लागला.

देशभरातील अनेक युजर्सनेही याबाबतच्या तक्रारी केल्या आहे. यामुळे अनेक युजर्सना याचा फटका बसला आहे. यामुळे 36 टक्के लोकांना सर्वर कनेक्शनचा सामना करावा लागला. तर 22 टक्के लोकांनी त्यांना लॉगइनसाठी अडचणी येत असल्याचे सांगितले. याआधी 11 जुलैला मेटाच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि वॉट्सअॅपचे सर्वर अचानक डाऊन झाले होते. 20 दिवसात दुसऱ्यांदा इंस्टाग्रामची सेवा ठप्प झाली आहे. तसेच 24 तासात इंस्टाग्राम आणि वॉट्सअॅप सेवा ठप्प झाल्या आहेत. बुधवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास WhatsApp ची सेवा डाऊन झाली होती. या सेवा ठप्प झाल्याने युजर्सना अडचणींचा समाना करावा लागला.