
भाजप आमदार राहुल कुल अध्यक्ष असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या विरोधातील तक्रार राऊत यांनी गृहमंत्रालयाकडे दिले होते. याप्रकरणी राज्य सरकारने आज विधानसभेत राहुल कुल यांनी क्लिन चीट मिळाल्याचे जाहीर केले. त्यावरून संजय राऊत यांनी राज्य सरकार व भाजपवर टीका केली आहे. ”
”काल दौंड न्यायालयाने सीआरपीसी 202 नुसार तक्रारदार नामदेव ताकवणे यांच्या तक्रारीला महत्त्व देऊन कारखानचे चेअरमन, संचालक, लेखापरिक्षकांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यात काही तथ्य असल्याशिवाय देणार नाहीत. त्यातल्या त्रुटी घोटाळे सविस्तर माहिती गृहमंत्र्यांना दिली, सीबीआयली दिली. तरीही ते क्लिनचीट देत असतील तर आम्ही जे म्हणतोय वॉशिंग मशीन ते खरंच आहे. त्या वॉशिंगमशीनमध्ये कुणीतरी जावं घुसळून काढावं व क्लिन व्हावं” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
”गृहमंत्र्यांना या विषयातलं काही माहित नाही. भ्रष्टाचार करणारा त्यांच्या पक्षाचा माणूस आहे. त्यामुळे त्याला आपण वाचलवं पाहिजे ही त्याची भूमिका आहे. ऑडिट रिपोर्ट दिलेला अशतानाही क्लिन चीट देणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रसारमाध्यमांनी त्या कारखान्याचे जे शेतकरी सभासद आहेत, त्यांच्याशी बोलावं तेव्हा कळेल कसा घोटाळा झालाय. पाचशे कोटींचं मनीलाँडरिंग आहे. पाचशे कोटींचा हिशोब लागत नाहीए. शेतकऱ्यांचे ५०० कोटी चोरले आहेत. हे स्पष्ट आहे. खरं तर असे लेखापरिक्षक जे क्लिन चीट देत आहेत. उद्या आमचं सरकार येईल तेव्हा त्यांच्यावर कारवाया करू आम्ही”, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
”या सरकारने तर यांनी क्लिन चीटचा कारखानचा उघडला आहे. राधाकृष्ण विखे पाटील स्वत: मान्य करत आहेत. मी म्हणालो होतो विखे पाटील यांच्या संस्थेला झाकीर नाईक यांच्याकडून साडे चार कोटी रुपये मिळाले. इक्बाल मिर्ची दाऊद इब्राहिम यांच्यासोबत व्यवहार झाल्याने काही लोकं तुरुंगात आहेत. विखे पाटील स्वत: सांगतता की मला चार कोटी नाही तर अडीच कोटी मिळाले. म्हणजे त्यांनी मान्य केलं की त्यांच्या संस्थेला अडीच कोटी मिळाले आहेत. तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही”, असे संजय राऊत यांनी सांगितले.
ठाणे हा फक्त बाळासाहेबांचा व शिवसेनेचा बालेकिल्ला
”उद्या शिवसेनेचा हिंदी भाषिकांचा ठाण्यात मेळावा आहे. ठाणे कुणाचाही बालेकिल्ला नाही. तो फक्त आणि फक्त शिवसेनेचा आहे, बाळासाहेबांचा बालेकिल्ला आहे, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.



























































