ग्रंथयात्रा- ह. ना. आपटेंची ‘यमू’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>अर्चना मिरजकर

आज मी आपल्याला यमूची गोष्ट सांगणार आहे. म्हणजे तिनेच स्वतची गोष्ट लिहून ठेवली आहे आणि ती 1893 साली ‘मनोरंजन’ मासिकात ाढमश छापूनही आली. यमुना ऊर्फ यमू ही एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्राr. संवेदनशील मन असलेली यमू आणि तिला सोसावी लागलेली दुःखे त्या काळच्या परावलंबी आणि शोषित स्त्राr वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. म्हणूनच यमूच्या गोष्टीने सवाशे वर्षांपूर्वी जशी वाचकांना उत्कंठा लावली होती, तशी ती आजही आपल्याला खिळवून ठेवते. ही यमू आहे हरी नारायण आपटे यांच्या ‘पण लक्षात कोण घेतो’ या कादंबरीची नायिका.

हरिभाऊ हे एक असामान्य लेखक होते. स्त्राrशिक्षणाचा पुरस्कार करून स्त्रियांची परवशता संपवणे आणि पुरुषांना व्यसनमुक्त आणि ध्येयवादी आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. त्यांनी 12 सामाजिक आणि 11 ऐतिहासिक कादंबऱया लिहिल्या. प्रत्येक कादंबरीत त्यांनी एक वेगळं आणि अतिशय विश्वसनीय असं जग निर्माण केलं. ‘पण लक्षात कोण घेतो’ ही कादंबरी यमूने लिहिलेल्या आत्मकथनाच्या रूपात सादर केली आहे. हरिभाऊंच्या एका मित्राच्या बहिणीने लिहिलेले हे आत्मकथन त्यांच्या हाती आले आणि त्यांनी ते प्रकाशित करायचे ठरवले, असे त्यांनी या कादंबरीला स्वरूप दिले आहे. लेखिकेच्या अकाली मृत्यूमुळे हे आत्मकथन अपूर्ण राहिले होते म्हणून त्यांनी तिच्या भावाला समारोपाचे एक प्रकरण लिहिण्याची विनंती केली. ते प्रकरण व त्याचे एक पत्रदेखील त्यांनी कादंबरीच्या शेवटी छापले. मोठय़ा कल्पकतेने निर्माण केलेल्या या पार्श्वभूमीमुळे त्या काळच्या वाचकांची खात्रीच झाली होती की, हे खरंच एका स्त्राrचं आत्मकथन आहे. अशी ही मराठीतील पहिली पात्रमुखी कादंबरी.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मराठीतील पहिली वास्तववादी कादंबरी आहे. मराठी कादंबरीला हरिभाऊंनी कल्पनारंजनातून वास्तवात आणलं. त्यांच्या कादंबऱया तत्कालीन समाजजीवनावर आधारित होत्या. त्या काळातील समाजाचे प्रश्न, विशेषत स्त्रियांची हलाखीची परिस्थिती, सुधारणावादी आणि सनातनी मतांमधला संघर्ष, नव्या आणि जुन्या पिढीतील संघर्ष यांसारखे अनेक विषय त्यांनी हाताळले. ‘पण लक्षात कोण घेतो’ या कादंबरीतदेखील त्यांनी त्या काळच्या अनेक सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकला. शिक्षणाच्या अभावी झालेले स्त्रियांचे परावलंबन,

पुरुषप्रधान संस्कृतीमुळे होणारे स्त्रियांवरचे अत्याचार आणि समाजाने त्यांना दिलेली दुय्यम दर्जाची वागणूक हा तर या कादंबरीचा मुख्य विषय आहेच. शिवाय त्याअनुषंगाने सामाजिक सुधारणांना होणारा विरोध, एकत्र कुटुंबात होणारी कुचंबणा, व्यक्तिस्वातंत्र्याचा अभाव हे विषयदेखील त्यात येतात.

या कादंबरीचे वैशिष्टय़ म्हणजे हरिभाऊंची लेखनशैली. ही शैली इतकी प्रगल्भ आहे की, कथानकात रोमांचक प्रसंग नसूनदेखील ती वाचकांना खिळवून ठेवते. एका स्त्राrचे आत्मनिवेदन लिहिताना हरिभाऊ हुबेहूब स्त्रियांची भाषा, त्यांच्या लकबी, त्यांच्या बोलण्यात येणारे वाक्प्रचार आणि म्हणी यांची उत्तम योजना करतात. यमू नायिकेव्यतिरिक्त या कादंबरीत इतर अनेक स्त्रिया आहेत. मुळात चुणचुणीत आणि धीट असलेली, पण व्यसनी आणि ाtढर नवऱयाच्या जाचामुळे खंगलेली दुर्गी, लहान वयात पोक्तपणाचा आव आणून आपला मतलब साधून घेणारी माई, समंजस आणि लाघवी स्वभावाची यमूची आई, निर्मळ मनाची यमूची सासू, परित्यक्तेचे आयुष्य जगावे लागल्यामुळे कायम असमाधानी असलेली नणंद, पुण्यशील परंतु नवऱयाच्या जाचाने पिडलेली मामेसासू, सुशिक्षित आणि सुधारणेचा पुरस्कार करणाऱया लक्ष्मीबाई आणि यशोदाबाई अशा अनेक स्वभावाच्या स्त्रिया त्यांच्या स्वभावांच्या सर्व बारकाव्यांसह आपल्यासमोर येतात. केवळ स्त्रियाच नव्हे, तर पुरुष पात्रांतदेखील ही विविधता आढळते. शंकरमामंजी, गोपाळमामंजी, दादा, रघुनाथराव, बाबा, दुर्गीचा नवरा या प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, वागण्या-बोलण्याची पद्धत निराळी.

कादंबरीची सुरुवात होते ती बाहुला-बाहुलीच्या लग्नापासून. यमू, तिच्या मैत्रिणी आणि यमूचा भाऊ मोठय़ा रंगात येऊन लग्नाचा खेळ खेळत असतात. अचानक यमूचे बाबा ऑफिसातून घरी येतात आणि चिडून मुलांचा खेळ उधळून लावतात. खेळ ऐन रंगात आलेला असताना रंगाचा बेरंग होतो. हा प्रसंग जणू संपूर्ण कादंबरीचा आणि यमूच्या आयुष्याचा सूचक आढावाच असतो. एक कादंबरीकार म्हणून हरिभाऊंचे कौशल्य केवळ एक रंजनात्मक कथा घडविण्यापुरते सीमित नाही. या कादंबरीतून ते एक शाश्वत असे भावसत्य निर्माण करतात. या कादंबरीतील पात्रे केवळ त्या काळाच्या परिस्थितीशी किंवा तत्कालीन प्रश्नांशी निगडित राहत नाहीत. त्या व्यक्तिरेखा मानवी मनाची, आचार-विचारांची आणि परस्परसंबंधांची मूलतत्त्वे उलगडून दाखवतात. या पात्रांच्या कृतींतून आपल्याला माणसाच्या भावनांचे आणि प्रेरणांचे स्रोत समजतात. म्हणूनच हरिभाऊंच्या कादंबरीतील पात्रे आजही तितकीच जिवंत आणि स्वाभाविक वाटतात.

या कादंबरीत हाताळलेले सामाजिक संदर्भ आज बऱयाच अंशी बदलले असले तरी त्यात आपल्याला मानवी जीवनाचे शाश्वत असे प्रतिबिंब दिसते आणि म्हणूनच आजही ही कादंबरी आपल्याला वाचावीशी वाटते.

[email protected]

ब्लर्ब: ‘पण लक्षात कोण घेतो’ या कादंबरीविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी पहा ग्रंथयात्रा भाग 15 www.youtube.com/@granthyatra