मणिपूरमधून 3 महिन्यांत 30 नागरिक बेपत्ता; सामान्यांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
manipur-violence
फाईल फोटो

गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूर हे राज्य धुमसत आहे. कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये हिंसाचार उफाळला असून त्यात सामान्य जनता होरपळत आहे. दरम्यान, या हिंसाचाराच्या काळात सुमारे 30 जण बेपत्ता झाल्याचं वृत्त आहे. यात सामान्यांपासून ते पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून ते आतापर्यंत 30 जण बेपत्ता असल्याचं अधिकृत आकडेवारीतून समोर आलं आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बेपत्ता होणाऱ्यांमध्ये युमखैबम किरणकुमार सिंह हे पत्रकार, संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ते बेपत्ता झाले आहेत. 6 मे रोजी हिंसा उफाळल्यानंतरच ते बेपत्ता झाले असून अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.

मणिपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वसाधारणतः बेपत्ता व्यक्तिविषयी तक्रार नोंदवल्यानंतर तपासाला सुरुवात केली जाते. पण, सध्या इथली परिस्थिती इतकी अस्थिर आहे, की पोलिसांचा फौजफाटा ती नियंत्रित करण्यात जुंपल्यामुळे बेपत्ता माणसांचा शोध घेता आलेला नाही. आतापर्यंत 6 हजाराहून अधिक झिरो एफआयआर नोंदवल्या गेल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.