विद्यार्थी एमबीबीएस, बीडीएसच्या 10 हजार जागा तर 47 हजार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीटच्या धर्तीवर एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या जागा पटकवण्यासाठी यंदा मोठी चुरस दिसणार आहे. सीईटी सेलकडून 47 हजार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे, मात्र एमबीबीएस, बीडीएसच्या 10 हजार जागा आहेत. पहिली अंतिम निवड यादी 4 ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे. राज्यात सीईटी सेलकडून वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची  केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत  एमबीबीएस व बीडीएस प्रवेशासाठी गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. या यादीत गुणवत्ता यादीमध्ये पहिल्या स्थानावर असलेला विद्यार्थी हा नीटच्या ऑल इंडिया रँकिंगमध्ये सातव्या क्रमांकावरील आहे, तर दुसऱया क्रमांकावरील विद्यार्थी 44 व्या क्रमांकावर आणि अखेरचा म्हणजे 46 हजार 959 वा विद्यार्थी ऑल इंडिया रँकिंगमध्ये 12 लाख 22 हजार 148 व्या क्रमांकावरील आहे. विद्यार्थ्यांना 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत पसंतीक्रम नोंदविता येणार आहे, तर 4 ऑगस्ट रोजी पहिली फेरीची निवड यादी जाहीर केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 5 ते 9 ऑगस्टदरम्यान संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे.