
नगर जिह्यासाठी वरदान ठरलेल्या मुळा धरणातील पाणीसाठय़ात वाढ झाल्याने शेतकऱयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 26 टीएमसी पाणीसाठा असलेल्या धरणात (शनिवारी) अखेर धरणसाठा 18.870 टीएमसीच्या पुढे गेला असून, 73 टक्के धरण भरले आहे. येत्या पंधरा दिवसांत मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मुळा धरणाखालील लाभक्षेत्र असलेल्या राहुरी, सोनई, नेवासा, शेवगाव, पाथर्डी तालुक्यांतील शेती सिंचनासाठी मुळा धरण हे वरदान ठरलेले आहे. मुळा धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याला वर्षातून दोन ते तीन आवर्तने सोडले जाते. मे अखेर धरणसाठा साडेआठ ते नऊ टीएमसी होत़ा आजअखेर मुळा धरणात नव्याने दहा टीएमसी पाणी आल्याने मुळा धरण येत्या पंधरा दिवसांत पूर्ण क्षमतेने भरणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.



























































