महिलेला पाहून अश्लील कृत्य करणारा अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरदिवसा महिलेला पाहून अश्लील कृत्य करणाऱ्याला खेरवाडी पोलिसांनी अटक केली. फैजल शेख असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार महिला या वांद्रे येथे काम करतात. शुक्रवारी सकाळी त्या वांद्रे पूर्व येथून बीकेसीच्या दिशेने जात होत्या तेव्हा फैजलने त्याचा पाठलाग केला. त्या बीकेसी परिसरात आल्या तेव्हा फैजलने महिलेला पाहून अश्लील कृत्य केले. एवढय़ावर न थांबता तो महिलेकडे पाहून जोरात हसू लागला. महिलेने याची माहिती तेथे गस्तीला असलेल्या पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी फैजलला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फैजलविरोधात गुन्हा नोंद केला.