
भाजपचं समर्थन करणारे आणि त्यांना मतदान करणार राक्षसी वृत्तीचे असल्याची टीका काँग्रेसचे खासदार रणदीप सूरजेवाला यांनी केली आहे. हरयाणा येथील कैथल येथे बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.
हरयाणाच्या कैथल येथे एका जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी सूरजेवाला येथे पोहोचले होते. हरयाणातील बेरोजगारीवरून त्यांनी खट्टर सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आजचे तरुण न्याय मागण्यासाठी उन्हात चालायला घाबरत नाहीत. खरंतर ते सरकारच्या अन्यायाला जास्त घाबरतात. तेच कारण आहे की आम्ही या तरुणांसाठी इथे आलो आहोत. तुम्ही त्यांची परीक्षा देण्याची संधीही हिरावून घेत आहात. भाजप आणि जेजेपी हे राक्षसी पक्ष आहेत. जे लोक भाजपला मत देतात आणि त्यांचं समर्थन करतात, तेही राक्षसी वृत्तीचे आहेत. आज महाभारताच्या या भूमिवरून मी त्यांना शाप देतो, अशी टीका सूरजेवाला यांनी केली आहे.
#WATCH जो लोग भाजपा को वोट देते हैं और भाजपा समर्थक हैं, वे राक्षस प्रवृत्ति के हैं। मैं महाभारत की इस भूमि से श्राप देता हूं… : कैथल में कांग्रेस सांसद रणदीप सुरजेवाला, हरियाणा
(13.08.2023) pic.twitter.com/eotlPvPlUU
— ANI_HindiNews (@AHindinews) August 14, 2023




























































