अपत्यप्राप्तीचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा टोळी गजाआड; तळबीड पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अपत्य प्राप्तीचे आमिष दाखकून लाखो रुपयांचा गंडा घालून औषधे गळय़ात मारणारी परजिल्ह्यातील भोंदूगिरी करणारी गुन्हेगार टोळी गजाआड करण्यात तळबीड पोलिसांना यश आले आहे. कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना अशाप्रकारे भोंदूगिरी करणाऱया या टोळीकडून जिल्ह्यात अनेकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राहुल धरमगिरी गोसाकी (कय 32, रा. तिरंगानगर, जि. धुळे), अश्विन अशोक गोसाकी (कय 34, रा. गोसाकी कस्ती, हडपसर, पुणे, मूळ गाक काकोत, जि. जळगाक), शैलेश सुरेश गोसाकी (कय 22, रा. तिरंगानगर), देवेंद्र ज्ञानेश्वर पकार (कय 32, रा. सुशिलानगर, साक्री) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

जिल्ह्यात अशी टोळी कार्यरत असल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांना मिळाली. याबाबत त्यांनी तळबीड पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या. पोलिसांनी संबंधित दाम्पत्यांशी चर्चा करून याबद्दल माहिती घेतली. ज्यांना मूल होत नाही अशा दाम्पत्यांना नारायण वाघ या तथाकथित वैद्याने 21 जुलै 2023 रोजी फोनवरून संपर्क करून, तुम्हाला आपल्याकडील औषधाने मूल होऊ शकते, ते औषध मी मोफत देतो, फक्त आमच्या मठाची 11 हजार रुपयांची पावती घ्यावी लागेल असे सांगितले. यातून त्याने दाम्पत्यांचा विश्वास संपादन केला. दाम्पत्यासह चौघेजण त्यांच्याकडे गेले. अपत्य होण्यासाठीची औषधे महाग असल्याचे सांगत सातारा येथील शाही एजन्सी या आयुर्वेदिक मेडिकलमधून 1 लाख 76 हजारांची औषधे दाम्पत्यांना घेण्यास भाग पाडले.

सोमवारी (दि. 14) पुन्हा तळबीड येथे येकून त्या दाम्पत्यांची मेडिकलमधील किटने टेस्ट करून ही महिला गरोदर असल्याचे या टोळक्याने सांगितले. तथापि, ही टेस्ट कोणत्याही डॉक्टरकडून करून घेऊ नका, नाहीतर ती टेस्ट निगेटिक्ह येईल, असे त्यांनी बजावले. पुन्हा त्यांना 2 लाख 60 हजार रुपयांची औषधे घ्या, असे सांगितले. तेक्हा या दाम्पत्याला या प्रकाराचा संशय आल्याने कराड येथील डॉक्टरकडे तपासणी केली असता ती महिला गरोदर नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

भोंदू वैद्याचे नावही निघाले बोगस

याबाबत या लोकांकिरुद्ध बुधवारी (दि. 16) तळबीड पोलीस ठाण्यात तक्रार दिली गेली. त्याचदिकशी या टोळीचे लोक पुन्हा तळबीड येथे आले असल्याची माहिती दाम्पत्याने पोलिसांना दिली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक राहुल करोटे, पोलीस हकालदार आप्पा ओंबासे, पोलीस नाईक योगेश भोसले, पोलीस कॉन्स्टेबल अभय मोरे यांनी टोळीतील लोकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, जो इसम नारायण काघ कैद्य म्हणून सांगत होता, त्याचे खरे नाक राहुल धरमगिरी गोसाकी असल्याचे स्पष्ट झाले. या टोळीने सातारा जिह्यात बऱयाच लोकांना गंडा घातला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे करत आहेत.