चंद्रभूमीवर गंधक, ऑक्सिजनचे अस्तित्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रावरील खनिजांचा शोध घेणाऱ्या प्रज्ञान रोव्हरवरील विश्लेषण यंत्रणेला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील मातीत गंधकाचा अंश आढळून आला आहे. या उपकरणाला चंद्रावरील मातीत अपेक्षेप्रमाणे अॅल्युमिनियम, पॅल्शियम, लोह, क्रोमियम, टिटॅनियम, मँगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजनचेही अस्तित्व आढळले आहे. हायड्रोजनचा शोध सुरू आहे, असे ट्विट इस्रोने केले आहे.