
देशाच्या राजधानी दिल्लीत शनिवार आणि रविवारी जी-20 देशांची शिखर परिषद होत आहे. या परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, आतापर्यंत 4100 कोटी रुपयांवर खर्च केल्याची माहिती आहे. दरम्यान, या परिषदेसाठी उपस्थित राहणाऱया विविध देशांच्या प्रमुखांसाठी खास सोन्या-चांदीचा मुलामा (कोटींग) दिलेल्या भांडय़ांमध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
जी-20 परिषदेचे यजमानपद यावर्षी हिंदुस्थानकडे आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह 20 देशांचे प्रमुख परिषदेला हजर राहणार आहेत. मात्र, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे उपस्थित राहणार नाहीत. त्याऐवजी त्यांचे प्रतिनिधी हजर राहणार आहेत. परिषदेच्या निमित्ताने रस्ते, फुटपाथ चकाचक केले असून, अनेक ठिकाणी रंगरंगोटी केली आहे. पथदिवे दुरुस्तीसह सुरक्षा व्यवस्थेवरही मोठा खर्च करण्यात आला आहे. 4100 कोटी रुपयांवर खर्च केले असून, 12 प्रकारच्या सेवांमध्ये हा पैसा खर्च केल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे.
एकूण खर्चाच्या 98 टक्के खर्च 3600 कोटी रुपये वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱया ‘आयटीपीओ’ने केला आहे. दिल्ली पोलिसांनी 340 कोटी, एनडीएमसीने 60 कोटी तसेच दिल्लीच्या सर्वाधिक बांधकाम विभागाने 45 कोटी, दिल्लीच्या वन विभागाने 16 कोटी, एमसीडीने 5 कोटी रुपये खर्च केले आहेत.
अर्थसंकल्पात केली होती 990 कोटींची तरतूद
2023-24चा अर्थसंकल्प सादर करताना पेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जी-20 परिषदेसाठी 990 कोटींची तरतूद केल्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात खर्च झाले 4100 कोटी रुपये.
इंडिया गेट नागरिकांसाठी बंद
जी-20 परिषदेमुळे इंडिया गेट, कर्तव्य पथ येथे सर्वसामान्य नागरिकांना दोन दिवस बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी चालण्यास पिंवा सायकलिंग करण्यास, पर्यटनास येऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या ऑनलाइन वितरणास परवानगी आहे. परंतु नवी दिल्ली जिह्यात अन्न वितरण सेवांवर निर्बंध असतील. पत्रकारांनी जी-20 परिषदेच्या प्रवेशिका जवळ ठेवावी. तसेच आपल्याबरोबर त्यांच्या संस्थेचे ओळखपत्र सुरक्षा यंत्रणेला दाखवावे लागेल.
15 हजार खास भांडी
जी-20 परिषदेसाठी येणाऱया विविध देशांचे प्रमुख आणि नेत्यांची खास बडदस्त ठेवण्यात येणार आहे. सोने-चांदीचा मुलामा दिलेल्या भांडय़ांमध्ये जेवण दिले जाणार आहे. त्यासाठी पेंद्र सरकारने जयपूरच्या भांडीनिर्मिती करणाऱया पंपनीला पंत्राट दिले. जयपूर, पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि देशातील विविध भागांतील 200 कारागिरांनी तब्बल 15 हजार भांडी बनविली आहेत. त्यात ताट, वाटय़ा, ग्लास, चमचे आदी भांडी आहेत. या भांडय़ांवर हिंदुस्थानी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱया कलाकृती आहेत.

























































