
शहर परिसरात दुचाकी चोरणार्या चोरट्याला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून चोरीच्या आणखी तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.ओंकार उर्फ बुट्या संतोष सातपुते असे त्या आरोपीचे नाव आहे.
सिंहगड रोड पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. कॅनोल रस्ता भागात पथक गस्तीवर असताना एकजण संशयीतरित्या दुचाकीवरून येत होता. त्याच्या दुचाकीला नंबरप्लेट नसल्याचे पाहून पोलिसांनी त्याची दुचाकी अडवली. त्याच्याकडे कागदपत्रांबाबत विचारणा केली असता तो उडवाउडविची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी जाब विचारताच त्याने दुचाकी चोरल्याचे कबूल केले. चौकशीदरम्यान आरोपीने आणखी दोन दुचाकी चोरल्याची कबू्ली दिल्याने त्यांच्याकडून चोरीच्या आणखी तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.
सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक गणेश मोकाशी, आबा उत्तेकर, संजय शिंदे, विकास पाडोळे, विकास बांदल, अमोल पाटील यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.































































