बुलेट ट्रेनच्या कामासाठी बीकेसीतील दोन मार्ग बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सध्या वेगात सुरू असून वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या जागेवर भुयारी स्थानकाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे उद्या बुधवारपासून संकुलातील डायमंड जंक्शन ते जे.एस.डब्ल्यू. कार्यालय आणि बीकेसी रोड प्लॅटिना जंक्शन ते मोतीलाल नेहरू नगर ट्रेड सेंटर हे मार्ग पुढील नऊ महिन्यांसाठी काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होणार आहे.

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन टर्मिनसच्या या कामासाठी मेघा इंजिनीअरिंग अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड आणि हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन पंपनी या दोघांना पंत्राट दिलेले आहे. त्यानुसार स्थानकाचे पहिल्या टप्प्यात काम सुरू झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर बीकेसी वाहतूक विभागाच्या कार्यक्षेत्रातील डायमंड जंक्शन ते जे.एस.डब्ल्यू. कार्यालय आणि बीकेसी रोड प्लॅटिना जंक्शन ते मोतीलाल नेहरू नगर ट्रेड सेंटर हे मार्ग 30 जून 2024 पर्यंत ठेवण्यात येणार आहेत.

नो एण्ट्री
– एमटीएनएल जंक्शन, रज्जाक जंक्शन, कुर्ला, बीकेसी परिसरातून येणाऱया वाहनांना बीकेसी रोड डायमंड जंक्शनमार्गे डावे-उजवे वळण घेऊन खेरवाडी परिसरातील जेएसडब्ल्यू कार्यालयाकडे ‘नो एण्ट्री’ असेल.
– खेरवाडी परिसरातून, एशियन हार्ट हॉस्पिटलमधून येणाऱया आणि जेएसडब्ल्यू ऑफिसकडून डायमंड जंक्शन, बीकेसी भागात डाव्या-उजवीकडे टर्न घेऊन जाणाऱया वाहनांना ‘नो एण्ट्री’ असेल.
– एमटीएनएल जंक्शन, रज्जाक जंक्शन, कुर्ला, बीकेसी परिसर, बीकेसी रोड स्ट्रीट नंबर 10, प्लॅटिना जंक्शन येथून मोतीलाल नेहरू नगर व्यापार केंद्राकडे डावे-उजवे वळण घेऊन येणाऱ्या वाहनांना ‘नो एण्ट्री’ असेल.

पर्यायी मार्ग
– एमटीएनएल जंक्शन, रज्जाक जंक्शन, कुर्ला, बीकेसी परिसरातून बीकेसी रोड, डायमंड जंक्शन, जेएसडब्ल्यू कार्यालयातून खेरवाडी भागाकडे जाणारी वाहने डायमंड जंक्शन/नाबार्ड जंक्शन-उजवीकडे वळण-एशियन हार्ट हॉस्पिटल-जेएसडब्ल्यू कार्यालय आणि खेरवाडी परिसरातून पुढे जातील.
– खेरवाडी परिसर-एशियन हार्ट हॉस्पिटल-जेएसडब्ल्यू कार्यालयाकडील वाहनांची वाहतूक नाबार्ड जंक्शनपासून बीकेसीकडे.
– एमटीएनएल जंक्शन, रज्जाक जंक्शन, कुर्ला, बीकेसीतून मोतीलाल नेहरू नगरच्या दिशेने जाणारी वाहने एमटीएनएल जंक्शन येथे डावीकडे वळण घेईल.
– मोतीलाल नेहरू नगर व्यापार पेंद्राकडील वाहनांची वाहतूक आणि प्लॅटिना जंक्शन-बीकेसी क्षेत्राकडे जाणारी वाहतूक व्यापार केंद्राकडे डावीकडे-उजवीकडे वळण घेईल.