Ganeshotsav 2023 मानाच्या गणपतींची दिमाखदार मिरवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सनई-चौघड्याचे सूर, ताशांचा दणदणाट, ढोल- पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले – गणेशभक्त, गणपती बाप्पाच्या जयघोषात पुण्यगरीत मानाच्या गणपतीची दिमाखात मिरवणूक निघाली. सकाळपासूनच रस्त्यावर भाविकांनी गर्दी केली होती. रांगोळ्याच्या पायघड्या आकर्षक कमानींनी रस्ते फुलून गेले होते. मानाचा पहिला कसबा गणपतीपाठोपाठ तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग गणपतीची वाजत गाजत मिरवणूक निघाली. दुपारी 1 वाजेच्या सुमारास मिरवणूक मंडपात पोहोचली आणि विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची प्रथेप्रमाणे चांदीच्या पालखीमधून मिरवणूक उत्सव मंडपात पोहोचली. 11 वाजून 37 मिनिटांनी अर्थगीमठाचे मठाधिपती अण्णा महाराज यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. भाविकांनी बाप्पाच्या दर्शनाला प्रचंड गर्दी केली. मानाच्या गणपतीची माध्यान्हीला प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. कसला गणपतीचे चंदा 131 वे वर्ष साजरे करीत असून, यंदा श्री मोरगावचा गणपती मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे.

मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाने गणरायाच्या वाहनांचा देखावा यावर्षी करण्यात आला आहे. दुपारी 11.50 वाजता श्री भूषण महारुद्रा स्वामी महाराज, सज्जनगड सातारा (श्री समर्थ घराण्याचे अकरावे वंशज) यांच्या हस्ते गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाच्या गणपती मंडळाने बालाजी मंदिराचा देखावा साकारला आहे. बाप्पाची मिरवणूक फुलांच्या रथातून काढण्यात आली. उद्योजक तुळशीबाग माध्यान्हीला लाडक्या बाप्पांची विधिवत प्राणप्रतिष्ठा पुनीत बालन आणि जान्हवी धारीवाल-बालन यांच्या हस्ते 1 वाजून 45 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळाची 10 वाजता राम मंदिर येथून पालखीमधून मिरवणुकीला सुरुवात केली. तेथून पुढे बाबू गेनू चौक, जिलब्या मारुती चौक, शनिपार चौक येथून गणपती चौक आणि पुढे उत्सव मंडपात बाप्पा विराजमान झाले. पुणे मर्चटचे अध्यक्ष राजेंद्र बांठीया आणि उद्योजक राजेश शाह यांच्या हस्ते सकाळी 11.30 वाजता प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यंदा उज्जैन येथील महांकालेश्वर मंदिराचा देखावा मंडळाने साकारला आहे.

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचे टिळक पंचांगनुसार केसरीवाड्यात 2023 रोजी गणरायाचे आगमन झाले ‘असल्याचे ‘केसरी’ गणेशोत्सवाचे प्रमुख डॉ. रोहित टिळक यांनी सांगितले. मानाचा पाचवा केसरीवाड़ा गणेशोत्सव टिळक पंचांगानुसार आजपर्यंत साजरा करीत आला आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची सकाळी 8.30 वाजता मुख्य मंदिरापासून हनुमान रथातून आगमन मिरवणूक निघाली. आकर्षक फुलांचा रथ आणि त्यावर श्री हनुमानाच्या चार मूर्ती लावण्यात आल्या. मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक पोहोचली. देवळणकर बंधूंचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरवार बॅण्ड, प्रभात बॅण्ड, मयूर बॅण्ड आणि गंधाक्ष ढोल- ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग होता. गणेशोत्सवात अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते “श्रीं ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

अखिल मंडई मंडळाच्या ‘श्री’ ची आगमन ऑगस्ट 2023 रोजी गणरायाचे आगमन झाले मिरवणूक सकाळी 9 वाजता ओंकार रथातून निघाली. गणरायांची प्राणप्रतिष्ठा दुपारी 12 वाजता अँड. पराग एरंडे व अनुराधा एरंडे यांच्या हस्ते झाली. शारदा गजाननाची विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.