ईदच्या दिवशी निघालेल्या मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची घटना कर्नाटकच्या शिवमोगा तालुक्यात घडली आहे. त्यानंतर शिवमोगा शहरात 144 कलम लागू करण्यात आलं असून 40 जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे.
रविवारी संध्याकाळी ईदनिमित्त शिवमोगा शहरातील रागीगुड्डा येथे मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. ही दगडफेक करणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यावेळी त्यांच्यावरही दगडफेक करण्यात आली.
सुदैवाने पोलिसांची जास्तीची कुमक तिथेच असल्याने त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या दगडफेकीत पाच जण जखमी झाले आहेत. तर 40 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कलम 144 अन्वये शहरात संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे.




























































